Headlines

ब्रेकअपच्या चर्चांमध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचा ‘हा’ खासगी व्हिडीओ समोर

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. हे दोघं सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकतंच अर्जुननं मलायकाच्या बिल्डिंगमध्ये असलेला त्याचा फ्लॅट विकला. त्यामुळे त्या दोघांचा ब्रेकअप (Arjun Kapoor and Malaika Arora Breakup News) झाला अशा चर्चा सुरु झाल्या. आता चर्चांमध्ये त्या दोघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

या दोघांचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हे दोघंही निर्माता रितेश सिधवानी यांनी रुसो ब्रदर्ससाठी आयोजित केलेल्या पार्टीत हजेरी लावली होती. या पार्टीमध्ये दोघांनी कलर कॉरडिनेट करून कपडे परिधान केले आहेत. अर्जुन आणि मलायकाने जांभळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. त्यांच्या या स्टाइलची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. त्यांच्या या व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

यादरम्यान, मलायकाने जांभळ्या रंगाचा स्पार्कल ड्रेस परिधान केला आहे, तर अर्जुननेही तिच्या ड्रेसला मॅचिंग गडद जांभळ्या रंगाचा शर्ट घातला होता. अर्जुननं बांद्रा येथे मलायका अरोराच्या बिल्डिंगमधला त्याचा फ्लॅट विकला. यानंतर मलायका आणि अर्जुनच्या नात्यात काही अडचण येत असल्याचे मानले जात होते. मात्र, या जोडप्याने एकत्र येऊन सर्व अफवांना पूर्णविराम दिला.

अर्जुन आणि मलायका खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनी 2018 मध्ये सोशल मीडिया पोस्ट शेअर करत त्यांच्या रिलेशनशिपविषयी सांगितले. घटस्फोटित मलायका अर्जुन कपूरपेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे. मात्र, वयातील हे अंतर त्यांच्या नात्याच्या आड येत नाही.

अर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, त्याचा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट ‘एक व्हिलन रिटर्न्स’ लवकरच प्रदर्शित होणार आहे आणि सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्याशिवाय जॉन अब्राहम, दिशा पटानी आणि तारा सुतारिया देखील दिसणार आहेत. याशिवाय तो ‘कुत्ते’ या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत राधिका मदान, तब्बू आणि नसीरुद्दीन शाह यांच्याही भूमिका आहेत. पुढे, अर्जुन आसमान  भारद्वाजच्या अनटोल्ड आणि अजय बहलच्या ‘द लेडी किलर’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर दिसणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *