[ad_1]
#ArrestJubinNautyal first reaction from nubin nautiyal: बॉलिवूडचा प्रसिद्ध सिंगर जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) याच्या अटकेची मागणी सोशल मीडियावर जोर धरतेय. सोशल मीडियावर #ArrestJubinNautyal ट्रेड होत आहे.
हे हॅशटॅश वापरून नेटकरी जुबिन नौटियालच्या अटकेची मागणी करतायत.
जुबिन नौटियालचे (Jubin Nautiyal) एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं . या पोस्टरमध्ये 23 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जुबिनच्या आगामी कॉन्सर्टची माहिती लिहिली आहे. हे पोस्टर रेहान सिद्दीकी नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर शेअर केले आहे.
हे पोस्टर शेअर करताना त्याने लिहिले की, ‘माझा आवडता गायक ह्यूस्टनला येत आहे. खूप छान काम जयसिंग. तुमच्या अप्रतिम सादरीकरणाची वाट पाहत आहे. या ट्विटच्या कॅप्शनमध्ये जय सिंह हे नाव आल्यामुळे जुबिन नौटियाल ट्रोल होत आहे
कोण आहे जयसिंग?
चंदीगड पोलीस गेल्या ३० वर्षांपासून जयसिंगचा शोध घेत आहेत. जयसिंगवर व्हिडीओ पायरसी आणि ड्रग्ज तस्करीचा आरोप आहे. जय मुख्यतः पंजाबचा आहे पण आता तो अमेरिकेत राहतो. इतके गंभीर आरोप असणाऱ्या व्यक्तीच्या कार्यक्रमात जुबिन नौटियाल गात असल्याने त्याच्या अटकेची मागणी होत आहे.
या निषेधामुळे आता जुबिनचा हा कथित शो कॅन्सल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
आणि आता स्वतः जुबिन नौटियालने समोर येत या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आता सोशल मीडियावरील दावा केला आहे की 9 सप्टेंबर 2022 रोजी अमेरिकेतील जुबिनचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
ही बातमी समोर आल्यानंतर ट्रोल आर्मीने जल्लोष करायला सुरुवात केली. पण यामागील सत्य काय आहे, हे स्वतः जुबिन ने सांगितलं आहे गायकानेच सांगितले.या संपूर्ण प्रकरणावर जुबिन नौटियाल यांनी प्रतिक्रिया दिली.
त्याने लिहिले, ”नमस्कार फ्रेंड्स आणि ट्विटर परिवार. मी पुढील महिन्यात शूटिंगमध्ये व्यस्त असेल. सर्वांना विनंती आहे की, या अफवांनी विचलित होऊ नये. मला माझ्या देशावर प्रेम आहे आणि तुम्हा सर्वांवरही.”
त्यामुळे #ArrestJubinNautyal प्रकरणाला एक वेगळं आहे .
[ad_2]