Headlines

माधुरी दीक्षित राजकारणात प्रवेश करणार? पती श्रीराम नेनेंनी स्पष्टच सांगितलं!

[ad_1]

मुंबई : अभिनेत्री माधुरी दिक्षित लवकरच पंचक हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा ५ जानेवारीला रिलीज होणार आहे. या निमीत्ताने माधुरी यांनी नुकतीच झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीमध्ये राजकारणाविषयी मोठा खुलासा केला आहे. झी २४ तासच्या  ‘लिडर्स’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी आमचे मुख्य संपादक निलेश खरे यांनी माधुरी यांना प्रश्न विचारला की, अनेकदा माधूरी यांची राजकारणाच्या प्रवेशाविषयी चर्चा असते. 

खरंच माधुरी राजकारणामध्ये प्रवेश  करणार आहेत का? या प्रश्नाचं उत्तर देताना माधूरी दिक्षित म्हणाल्या की, नाही बिलकूल नाही मला राजकारणात काहीच रस नाही. बऱ्याचदा मला निवूडकणूका जवळ आल्या की, राजकारणातील प्रवेशाबद्दल विचारलं जातं. मात्र माझी ती पर्सनॅलिटी नाही मी एक अभिनेत्री आहे. मी अभिनयात काम करत होते आहे आणि कायम करत राहाणार आहे.माधूरी दिक्षित आणि श्रिराम लेले यांनी झी २४ तासच्या लिडर्स या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी याच बरोबर त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. माधूरी दिक्षीत आणि श्रीराम लेले निर्मीत पंचक हा सिनेमा येत्या ५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

श्रीराम नेने व माधुरी दीक्षित नेने निर्मित ‘पंचक’ चित्रपटातील जगण्याचे सार उमगवणारे एक सुरेख गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे.  जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत. आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दिप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *