Headlines

Lust Stories 2: विजय वर्मासह दिलेल्या इंटिमेट सीन्सवर अखेर तमन्ना भाटियाने केलं भाष्य; म्हणाली “त्याने फारच…”

[ad_1]

Lust Stories 2: बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) सध्या आपल्या प्रेमप्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आहे. तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा (Vijay Varma) यांचे सूत जुळले असून दोघांनीही आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. नेटफ्लिक्सवरील ‘Lust Stories 2’ मधून ही जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. याच सेटवर दोघांमधील प्रेमसंबंध फुलले अशी चर्चा आहे. दरम्यान ‘Lust Stories 2’ चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते सीरिज प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहे. दोघांनीही नात्याची कबुली दिली असल्याने  एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. 

दरम्यान ट्रेलरमध्ये तमन्ना आणि विजय यांच्यातील काही इंटिमेट सीनची झलक प्रेक्षकांना पाहण्यास मिळाली आहे. याआधीही तमन्नाने या वेब सीरिजमध्ये किसिंग सीन दिल्याचं समोर आलं होतं. विशेष म्हणजे आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदाच तमन्नाने आपला ऑन स्क्रीन किसिंग न करण्याचा नियम मोडला आहे. दरम्यान, तिने इंटिमेट सीन शूट करताना आपल्याला त्रास होऊ नये यासाठी विजय वर्माने फार मदत केल्याचं सांगितलं. 

काही आठवड्यांपूर्वी तमन्नाने Lust Stories 2 मध्ये काम केल्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांना डेट करणं सुरु केल्याचा खुलासा केला होता. तसंच विजय वर्मा म्हणजे आपलं आनंदाचं ठिकाण असल्याचं म्हटलं होतं. 

विजय वर्मासह दिलेल्या इंटिमेट सीनवर तमन्नाचं भाष्य

Bollywood Bubble ला दिलेल्या मुलाखतीत तमन्नाने हे सीन शूट करताना विजयने कशाप्रकारे आपली काळजी घेतली आणि सुरक्षित भावना निर्माण केली याबद्दल सांगितलं. विजय वर्माचं कौतुक करताना तिने सांगितलं की, “कोणत्याही अभिनेत्यासह मला इतकं सुरक्षित वाटलं नाही. एका अभिनेत्यासाठी हे जास्त महत्त्वाचं असतं. तुम्हाला तितकं सुरक्षित वाटणं महत्त्वाचं असतं. तुम्ही एक मोठी उडी मारण्यासारखं असतं, जेव्हा तुम्ही खासकरुन असा चित्रपट करता. त्याने मला पहिल्या क्षणापासून सुरक्षित वाटेल याची खात्री घेतली. यामुळे मला काही बोलताना, करताना भीती वाटत नव्हती. त्याने माझ्यासाठी गोष्टी सहज, सोप्या केल्या. त्याची ही गोष्ट मला प्रचंड आवडते”. यावर विजयने तमन्ना फार साधी आणि हुशार असल्याचं सांगितलं. 

दरम्यान दुसऱ्या एका मुलाखतीत तमन्नाने विजयसोबत काम करण्याचा तिचा अनुभव शेअर केला होता. “मला नक्कीच वाटलं होतं की मला एका अशा अभिनेत्यासोबत काम करण्याची संधी मिळेल, जो खूप वैविध्यपूर्ण आणि खूप शक्तिशाली अभिनय सादर करण्यात सातत्यपूर्ण आहे. तो एका सरड्याप्रमाणे पात्राकडे जातो. मी त्याने केलेलं आधीचं सर्व काम पाहिलं आहे. या प्रोजेक्टमध्ये अजून काही नसले तरी मी त्या दोघांकडून (विजय आणि सुजॉय) काहीतरी शिकू शकते असं मला वाटत होतं. यासाठी मला हा प्रोजेक्ट करायचा होता,” असं तमन्नाने सांगितलं. 

29 जूनला होणार प्रदर्शित

रोनी स्क्रूवाला आणि आशी दुआ यांनी ‘Lust Stories 2’ ची निर्मिती केली असून, 29 जूनला ती नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *