Headlines

लायन्स क्लब बार्शीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या उपस्थितीत शपथग्रहण सोहळा संपन्न

बार्शी – एम जे एफ लायन जितेंद्र जोशी यांनी माजी मंत्री दिलिप सोपल यांच्या उपस्थितीत लायन्स क्लब बार्शी च्या नुतन पदाधिकारी यांचा पदग्रहन समारंभ संपन्न झाला. यावेळी नगराध्यक्ष असिफभाई तांबोळी, झोन चेअरमन नंदकुमार कल्याणी यांचीही प्रमुख उपस्थिती होती.ॲड विकास जाधव अध्यक्षपदाची, संतोष जोशी सचिव तर खजिनदार पदांची अल्ताफ शेख यांनी शपथ घेतली.

यावेळी नविन संचालक मंडळ त्यामध्ये प्रथम अध्यक्ष ला.प्रशांत पंडित ,ला.अक्षय बंडेवार, महेंद्र कथले, गिरीश शेटे, ओंकार शहाणे, गोविंद तापडिया,गहिनीनाथ कदम,गोवर्धनदास जाजू, जयप्रकाश भराडीया, ऍड.दिनेश श्रीश्रीमाळ, डॉ. अतुल कुंभारे, डॉ. केशवराज मुळे,राहुल साखरे, नितीन कौलवार, सी.ए.विजय गापट,रविंद्र कसपटे, लखन राजपूत, गणेश लामतुरे अनिल देशपांडे, यांनाही संचालक मंडळ म्हणून पदग्रहण केला आहे.

ॲड विकास जाधव यांना यापूर्वी बार्शी वकील संघाचे अध्यक्ष, कोषाध्यक्ष कळंबवाडीचे सरपंच , सरपंच परिषद जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हासरचिटणिस राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेलचे जिल्हाध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस ढाळेपिंपळगाव पाणि बचाव समिती अध्यक्ष तसेच दिलिप फौंडेशनच्या अध्यक्ष अशा अनेक सामाजिक व राजकीय पदावर यशस्वी काम केले आहे सध्या सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस, या पदावर कार्यरत आहेत तसेच त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे.

लायन्स क्लबच्या या पूर्वीच्या सर्व अध्यक्षांनी क्लबची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहे तसेच भविष्यात ती ऊंची कायम ठेवण्यासाठी प्रयत्न राहील. तालुक्यात सर्व गावांमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे.गरजूंना शालेय साहित्य,व निराधारांना आधार देण्यासाठी प्रयत्न राहील. तरुणांना योग्य मार्गदर्शन करताना व्यवसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.आरोग्य शिबीर तसेच ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे .लायन्स क्लब बार्शी च्या परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न राहील सर्व पदाधिकारी यांना बरोबर घेऊन शास्वत काम उभे केले जाईल – नुतन अध्यक्ष ॲड विकास जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *