Headlines

LED TV मधील स्फोटात १६ वर्षीय मुलाचा मृत्यू, घरात टीव्ही असल्यास या चुका करू नका

[ad_1]

नवी दिल्लीः LED TV मध्ये स्फोट झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. ही घटना गाझियाबादमधील आहे. या स्फोटात एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका जोरदार होता की, घरातील भिंतीचा एक भाग कोसळला आहे. ज्या भिंतीवर टीव्ही टांगली होती. स्मार्टफोनमध्ये स्फोट किंवा आग लागल्याच्या घटना नेहमीच ऐकायला मिळत होत्या. परंतु, आता एलईडी टीव्हीत स्फोट झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जर तुमच्या घरात सुद्धा एलईडी टीव्ही असेल तर काही गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे. जाणून घ्या टिप्स.

घरातील जुनी वायरिंग
घरातील जुन्या वायरिंग इलेक्ट्रिक अप्लायंसेजमुळे आग लागण्याचे सर्वात मोठे कारण आहे. यासाठी आवश्यक म्हणजे आपल्या घरातील जुनी झालेल्या वायरिंगवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आवश्यक असल्यास त्याला बदलणे गरजेचे आहे. जुन्या वायरिंग मध्ये नेहमी शॉर्ट सर्किट होते. त्यामुळे घराला आग लागू शकते. तसेच टीव्हीला स्टँडबाय मोड मध्ये जास्त ठेवू नका. टीव्ही पाहत नसाल तर त्याला पूर्णपणे बंद करा.

वाचाः ‘मेक इन इंडिया’ सुस्साट, आयफोन नंतर आता Airpods ही भारतात बनणार

इलेक्ट्रिकल सर्किट ओवरलोड

घरात आवश्यकतेपेक्षा जास्त एक्सटेंशन वायरचा वापर करणे धोकादायक ठरू शकते. टीव्ही, कंप्यूटर आणि अन्य दुसरे इलेक्ट्रिक अप्लायंसेजला एकाच एक्सटेंशन बोर्डने कनेक्ट केल्यावर लोड खूप वाढू शकतो. अनेकदा यूजर्सला एक्सटेंशन बोर्डच्या क्षमतेचा पत्ता लागत नाही. जास्त लोड पडल्याने कोणतीही दुर्दैवी घटना घडू शकते. जास्त लोड पडल्याने एक्सटेंशन बोर्डची इंटरनल वायरिंग जास्त हिट होवू शकते. त्याला आग सुद्धा लागू शकते.

वाचाः ६४ मेगापिक्सल कॅमेराचे पॉवरफुल स्मार्टफोन्स, पाहा टॉप ४ ऑप्शन

लोकल रिपेयर आणि चुकीचे कॅपेसिटर
जुना टीव्ही जर खराब होत असेल तर नेहमी यूजर काही पैशाची बचत करण्यासाठी त्याला ऑथोराइज्ड सर्विस सेंटर ऐवजी लोकल टेक्निशयनकडून रिपेयर करून घेता. जर तुम्ही असे करीत असाल तर तात्काळ असे करणे थांबवा. लोकल टेक्निशियन टीव्हीला दुरुस्त करताना कमी दर्जाचे वायरिंग आणि कॅपेसिटरचा वापर करू शकतात. त्यामुळे ते ओव्हरहिट होवू शकतात.

वाचाः Samsung Galaxy M33 5G वर १० हजार रुपयांपर्यंतचा ऑफ, अशी मिळवा डील, पाहा फीचर्स

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *