Headlines

लग्झरी गाडी सोडून Twinkle Khanna नं लेकीसोबत केला रिक्षातून प्रवास, नेटकरी कौतुक करत म्हणाले…

[ad_1]

Twinkle Khanna and Daughter Nitara Travel From Auto-Rikshaw : बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या लग्झरीयस लाईफस्टाईलसाठी ओळखले जातात. सेलिब्रिटीज वेगवेगळ्या ब्रॅंडच्या कपड्यांपासून सगळ्याच गोष्टी वापरतात. त्यांच्या लग्झरीयस गाड्या तर सोडूनच्या द्या. मात्र, बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमाकची (Akshay Kumar) पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) तिच्या मुलीसोबत ऑटोरिक्षात फिरताना दिसली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

ट्विंकल खन्नाचा हा व्हायरल झालेला व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला होता. या व्हिडीओत ट्विंकल आणि तिची लेक नितारासोबत दिसत आहेत. यावेळी ट्विंकलच्या हातात शॉपिंग बॅग्स देखील दिसत आहे. दरम्यान, नितारा पापाराझींना (Nitara Kumar) पाहून लाजाळू झाल्याचे दिसत आहे.  

ट्विंकल खन्ना आणि तिची लाडकी मुलगी ऑटोरिक्षात बसताना पाहून पापाराझींनी त्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. हा व्हिडीओ पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं कारण बॉलिवूडचा अॅक्शन किंग अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना आणि मुलगी आलिशान आयुष्य जगतानाही ऑटोरिक्षातून प्रवास करत आहेत. ऑटोरिक्षात बसल्यानंतर रिक्षा चालकाला भाऊ चला असं म्हणते. (Twinkle Khanna and Nitara Viral Video) 

ट्विंकलनं तिच्या लग्नाच्या भविष्यवाणीविषयी खुलासा केला होता.ट्विंकलने तिचा ‘ट्विक इंडिया’ या शोमध्ये तिनं हा खुलासा केला होता. भविष्यवाणी विषयी बोलत असताना ट्विंकलने सांगितले की तिचे वडील म्हणजे राजेश खन्ना यांना देखील एका ज्योतिषीनं माझ्या लग्नाची भविष्यवाणी सांगितली होती. “माझा ज्योतिषीवर विश्वास नाही पण माझे वडील त्यांच्या ओळखीचे एक ज्योतिषी होते आणि त्यांनी माझ्या लग्ना आधीच माझा पती कोण होणार याची भविष्यवाणी केली होती. त्यांनी सांगितले होते की तू अक्षय कुमारशी लग्न करशील. मी म्हणाली कोण? त्याच पूर्ण नाव काय आहे. त्यावेळी तर मी अक्षयला ओळखत सुद्धा नव्हते”, असं ट्विंकल म्हणाली.

हेही वाचा : Shilpa Shetty पुन्हा वादाच्या भोवऱ्यात? Kissing प्रकरणी कोर्टानं विचारला सवाल

ट्विंकल खन्नानं 1995 मध्ये ‘बरसात’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. ट्विंकलला तिच्या या चित्रपटासाठी फिल्मफेअर डेब्यूचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर ट्विंकलनं तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करू शकले नाही. ‘जान’, ‘दिल तेरा दिवाना’, ‘उफ्फ ये मोहब्बत’, ‘इतिहास’, ‘जब प्यार किसी से होता है’, ‘जुल्मी’, ‘बादशाह’, ‘मेला’, ‘चल मेरे भाई’, ‘जोरू का गुलाम’, ‘लव के लिए कुछ भी करेगा’ या चित्रपटांमध्ये ती दिसली. तर तिच्या लेखिका म्हणून करिअरविषयी बोलायचं झालं तर तिनं आतापर्यंत तीन पुस्तके लिहिली आहेत. ‘मिसेस फनीबोन्स’, ‘द लिजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद’ आणि ‘पायजामा इज फॉरगिव्हिंग’.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *