Headlines

लग्नाला अनुपस्थित राहिलेल्या प्रियांका चोप्राला परिणिती-राघवला भेटायचा मुहूर्त मिळाला; फोटो व्हायरल

[ad_1]

Priyanka Chopra Parineeti Chopra:यावर्षी परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा शाही लग्नसोहळा पार पडला होता. करवा चौथच्या निमित्तानं परिणितीनं आपले आणि राघव चड्ढाचे एकत्र फोटोही शेअर केले आहेत. त्यांच्या या फोटोंना सोशल मीडियावरही तूफान लाईक्स येताना दिसत आहेत. प्रियांका चोप्रा आपल्या लाडक्या बहिणीच्या लग्नाला येऊ शकली नव्हती. नंतर मी मुंबईत मामि फेस्टिवलसाठी येऊन गेली पण तेव्हा तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. आपल्या बहिणीच्या लग्नाला न आल्यानं तिला सोशल मीडियावरती ट्रोल करण्याचा फंडा सुरू झाला होता. आता आपल्या अमेरिकेतील घरी परत जाताना तिनं आपल्या लाडक्या बहिणीची आणि जिजूची भेट घेतली सध्या त्याचे फोटो हे सर्वत्र व्हायरल झाले आहेत. यावेळी आपल्या बहीणीला मिठी मारून निरोप देताना दिसते आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार त्या दोघींची भेट मुंबई येथे झाली. आता प्रियांका ही दिल्ली येथे रवाना झाली आहे. यावेळी प्रियांका चोप्रा आणि परिणिती चोप्रा या दोघीही कलिना येथे मुंबई एअरपोर्ट नजीक स्पॉट झाले होते. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली होती. येथून त्या दोघी दिल्लीला जाणार आहेत. तिथे राघव चड्ढाशी त्या दोघींची भेट होणार आहे. यावेळी या दोघांचे फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्यांच्या या भेटीगाठीवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स येयला सुरूवात झाली आहे. यावर्षीपासून राघव चड्ढा आणि परिणिती चोप्रा यांच्या फोटोंना चाहत्यांनीही पसंती दर्शवली आहे. यावेळी नेटकरीही नानाविध कमेंट्स करताना दिसत आहेत. 

हेही वाचा : ‘आराध्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करतेय’ ऐश्वर्याचा ‘तो’ व्हिडीओ नेटकऱ्यांनी वारंवार पाहिला

प्रियांका चोप्रा एका सेशनसाठी मामि फिल्म फेस्टिवलला आली होती. यावेळी तिनं भुमी पेडणेकरशी संवाद साधला होता. या निमित्तानं मागील आठवड्यात ती मुंबईत आली आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चा होती. आता यावेळी परिणितीला न भेटता ती परदेशी गेलेली नाही हे यावरून सिद्ध होते. परिणितीच्या लग्नात प्रियांकानं आपल्या सासरी सुरू असलेल्या वादामुळे अनुपस्थिती लावली होती अशी चर्चा होती. परंतु लग्नाला न येऊ शकली तरी प्रियांकानं आपल्या लाडक्या बहीणीसाठी इन्स्टा स्ट्रोरी शेअर केली होती. 

प्रियांका सध्या हॉलिवूडमध्ये व्यक्त आहे. त्यातून तिचा आता जी ले जरा हा चित्रपटही चर्चेत आहे. यातून अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अभिनेत्री कतरिना कैफ यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा चित्रपट झोया अख्तर दिग्दर्शित करणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *