Headlines

कोजागरी पौर्णिमेला ग्रहांचा अद्भुत संयोग, देवी लक्ष्मीची पूजा आणि राशीफळ जाणून घ्या

[ad_1]

Kojagari Pornima Pooja Vidhi: अश्विन महिन्यातील पौर्णिमा ही शरद पौर्णिमा किंवा कोजागरी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते. कोजागरी पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या पौर्णिमेला देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते, अशी मान्यता आहे. या रात्री देवी लक्ष्मीची पूजा केल्यास भरभराट होते. यावेळी कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी विशेष योग जुळून आला आहे. ग्रहांचा गोचर पाहता मीन राशीत गजकेसरी योग तयार झाला आहे. गजकेसरी योग हा सर्वात शुभ योग मानला जातो. मीन राशीत गुरु ग्रह असून आज चंद्रासोबत युती होणार आहे. गुरू आणि चंद्राच्या युतीमुळे गजकेसरी योग तयार होत आहे. त्याचबरोबर बुध ग्रह आपल्या स्वराशीत असल्याने सुर्यासोबत होणाऱ्या युतीमुळे बुधादित्य योग तयार होत आहे. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी गजकेसरी आणि बुधादित्य योगासह शनिदेवही आपल्या स्वराशीत आहेत. 

पौर्णिमेला भगवान विष्णूची पूजेला विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर देवी लक्ष्मीची पूजा करा. भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवा आणि त्यावर तुळसीपत्र ठेवा. महालक्ष्मी अष्टक वाचा. चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची पूजा करा. चंद्राला अर्घ्य द्या आणि ॐ चं चंद्रमस्यै नम: .या मंत्राचा जप करा. गायीला नेवैद्य द्या. यामुळे दोषमुक्ती मिळते.  

मेष- पैसा शुभ कार्यात खर्च होणार असला तरी नियंत्रण ठेवा. आरोग्यासंदर्भात काही अडचणी येऊ शकतात. मन चिंताग्रस्त राहील.  पिवळी वस्तू जवळ ठेवा.

वृषभ – उत्पन्नात अपेक्षित वाढ होईल. चांगली बातमी मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील. आरोग्य, प्रेम, व्यवसाय सर्वकाही व्यवस्थित असेल. पिवळ्या वस्तू दान करा.

मिथुन – कोर्ट, कचेरीत विजय मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीत वाढ होईल. आरोग्य, प्रेम, व्यवसायात प्रगती दिसत आहे. देवी कालीची उपासना करत राहा.

कर्क- ग्रहांची तुमच्यासाठी चांगली राहील. आरोग्यात पूर्वीपेक्षा सुधारणा दिसेल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून चांगले दिसत आहे. पिवळी वस्तू जवळ ठेवा.

सिंह – या काळात तुम्हाला काही अडचणीत येऊ शकते. परिस्थिती प्रतिकूल दिसत आहे. कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नका. 

कन्या – ग्रह स्थिती पाहता जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसाय आणि कौटुंबिक समस्या दूर होतील.  भगवान विष्णूची उपासना करत राहा.

तूळ – रखडलेली कामे मार्गी लागतील. ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल. तुमचा व्यवसाय चांगला चालेल. पिवळ्या वस्तू दान करा.

वृश्चिक – विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असेल. व्यवसायासाठी ग्रहांची स्थिती उत्तम राहील. या काळात अडकलेली कामं मार्गा लागतील.

धनु – जमीन, इमारत, वाहन खरेदीसाठी हा काळ उत्तम आहे. आरोग्यासंदर्भात काही अडचणी येतील, त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवा. घरात काही कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. 

मकर – नोकरीत प्रगती होईल. तुमचे प्रियजन तुमच्यासोबत असतील. सर्वांच्या सहकार्याने व्यवसायात यश दिसून येईल. आरोग्य, प्रेम, व्यवसायासाठी हा काळ अनुकूल आहे. पिवळ्या वस्तू दान करा.

कुंभ – या काळात गुंतवणूक करणं टाळा. ग्रहाची स्थिती अनुकूल नाही, त्यामुळे आरोग्याकडे लक्ष ठेवाल. या काळात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा कराल.

मीन – गजकेसरी योग मीन राशीत तयार होत आहे. त्यामुळे वातावरण उत्साही राहील. व्याववसायातही सुधारणा दिसून येईल. पिवळी वस्तू जवळ ठेवा.

(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *