Headlines

Koffee With Karan मध्ये दिलं जाणारं गिफ्ट हॅम्परची किंमत लाखोंमध्ये? पाहून तुम्हालाही बसेल धक्का

[ad_1]

मुंबई : ‘कॉफी विथ करण’च्या (Koffee With Karan)  सर्व सीझनमध्ये, प्रत्येकाच्या मनात सर्वात जास्त उत्सुकता ही त्या हॅम्परबद्दल असते, जी शोमध्ये आलेल्या सेलिब्रिटींना दिली जातात. ‘कॉफी विथ करण’ वर दिसणार्‍या सर्व सेलिब्रिटींना रॅपिड फायर राउंडमध्ये काही प्रश्न विचारले जातात. त्या फेरीत जो विजयी होतो त्याला ‘कॉफी हॅम्पर’ दिला जातो. कॉफी हॅम्पर्स मिळाल्यावर, फक्त सेलिब्रिटीच प्रतिक्रिया देतात की त्यांना काय मिळाले आहे हे त्यांना माहित नाही.

हेही वाचा : ‘आमचं नात कायम…’, रतन टाटा यांच्या आयुष्यातील ‘तिचं’ पहिल्यांदाच जाहिर वक्तव्य

कॉफी हॅम्परमध्ये खरंच कॉफी असते का? यावरून करण जोहरने पडदा उचलला आहे. करणनं एका व्हिडिओमध्ये त्याचा ‘कॉफी हॅम्पर’ बॉक्स अनबॉक्स केला आणि त्यातील सर्व गोष्टी दाखवल्या. ‘कॉफी हॅम्पर’मध्ये कोणत्या गोष्टी असतात हे तुम्हाला कळलं तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.  

हेही सविस्तर : ‘Hero ला नग्न दाखवू शकत नाही, पण स्त्रीला नग्न दाखवले तर…’; स्मिता पाटील यांचे ‘ते’ वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत

डिस्ने प्लस हॉटस्टारनं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘कॉफी विथ करण 7’ चा व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये करण त्याच्या ‘कॉफी हॅम्पर’मध्ये काय आहे ते दाखवत आहे. त्यांच्या ब्रँड Tyaani या करण जोहरच्या ज्वेलरी ब्रँडशिवाय, Marshall Action II स्पीकर, Audi Espresso Mobile, Amazon Echo Show 10, Vahdam Tea and Tea Maker Set, Neuhaus Chocolates’s Collection Discovery Box, Bombay Sweet Shop, खोया स्वीट, 28 Baker Street, Coffee with Karan चा मग सारख्या अनेक गोष्टी आहेत. या हॅम्परची किंमत लाखोंमध्ये आहे. (Karan Johar Unveils What Is In There In His Koffee Hamper Unboxes Mobile Phones Jewellery Speakers Sweets Perfumes Champagne) 

हेही वाचा : साडी की टेबल क्लॉथ? Kriti Sanon ला पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न

या कॉफी हॅम्परमध्ये आणखी काही गोष्टी आहेत, ज्या दाखवण्यास करण जोहरने नकार दिला. पण त्यात मोबाईल फोन, परफ्युमच्या बाटल्या आणि शॅम्पेनची बाटली असल्याचे म्हटले जाते. करणनं 2000 मध्ये ‘कॉफी विथ करण’ लॉन्च केला. या वर्षी म्हणजेच सातव्या सीझनमध्ये करीना कपूर खान, आमिर खान, समांथा रुथ प्रभू, अक्षय कुमार, आलिया भट्ट, रणवीर सिंग, सोनम कपूर, अनन्या पांडे, अर्जुन कपूर, विजय देवरकोंडा आणि क्रिती सेनॉन आणि टायगर श्रॉफ करणच्या शोमध्ये दिसले होते. लवकरच ‘कॉफी विथ करण’चा आठवा सीझन येणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *