Headlines

KKBKKJ Box Office Collection Day 3: तिसऱ्या दिवशी सलमान खानच्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर ओलांडला 50 कोटींचा आकडा

[ad_1]

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection Day 3 : ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित करत सलमान खाननं (Salman Khan) त्याच्या चाहत्यांना खूप मोठी भेट दिली. चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी काही कमाई केली नाही. पण शनिवार रविवार पाहता चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. आता प्रेक्षकांना किसी का भाई किसी की जानचं वेड लागलं आहे, असं म्हणायला हरकत नाही.

खरंतर निर्मात्यांना आशा होती की सलमानचा हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. मग काय त्यादिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणार. पण चित्रपटानं पहिल्या दिवशी काही चांगली कमाई केली नाही. सलमानच्या चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळाली नाही हे पाहता त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला होता. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. 

ईदनंतर लगेचच विकेंडची सुट्टी पाहता सलमानच्या या चित्रपटाला त्याचा फायदा झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटानं तिसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 25-27 कोटींची कमाई केली. तर चित्रपटाच्या तीन दिवसाच्या कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर एकत्र चित्रपटानं 65-68 कोटींची कमाई केली. चित्रपटानं तीन दिवसात 50 कोटींचा आकडा पार केल्यानं निर्मात्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. आता चित्रपटाच्या पहिल्या दोन दिवसांच्या कलेक्शन विषयी विचारायचे झाले तर पहिल्या दिवशी चित्रपटानं फक्त 15.81 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी चित्रपटानं 25.75 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटासाठी अॅडव्हान्स बूकिंगही करण्यात आली होती. एकीकडे प्रेक्षक हा चित्रपट पाहत आहेत, तर दुसरीकडे काही प्रेक्षकांनी चित्रपटपसंतीस उतरला नाही असं सांगितलं तर चित्रपट समिक्षकांनी या चित्रपटाला काही खास रिव्ह्यू दिलेले नाहीत. त्यामुळे आता चित्रपट आज सोमवारी किती कमाई करतोय याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.  

हेही वाचा : मन्नतमध्ये पोहोचलेल्या ‘त्या’ मॉडेलसाठी Shah Rukh Khan नं बनवला पिझ्झा! ही खास पाहुणी पाहिली का?

दरम्यान, हा चित्रपट 21 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे. या चित्रपटात कलाकारांची एक मोठी टीम आहे. तर याच चित्रपटातून छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीनं मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. याशिवाय अभिनेत्री पूजा हेगडे, शहनाज गिल, भूमिका चावला, दाक्षिणात्य सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल आणि राघव जुयाल यांच्या महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *