Headlines

KK यांच्या निधनाआधी ‘या’ गोष्टी झाल्या असत्या तर…, आज ते आपल्यात असते

[ad_1]

मुंबई : प्रसिद्ध गायक केके उर्फ ​​कृष्ण कुमार कुननाथ यांचं तीन दिवसांपूर्वी निधन झालं. कोलकात्यात एका कॉन्सर्ट दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण कॉन्सर्ट संपल्यानंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि ते कोसळले. तब्येत बिघडल्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. वयाच्या .53 व्या वर्षी केकेने जगाचा निरोप घेतला. 

पण केके यांची तब्येत बिघडल्या काही गोष्टी तात्काळ झाल्या असत्या, तर आज केके आपल्यात असते. पण नियतीला काही वेगळचं मान्य होतं. केके यांच्या निधनानंतर पोस्टमार्टममध्ये काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. 

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केके यांच्या हृदयात 80 टक्के ब्लॉकेजेस होते.  लाईव्ह शोमध्ये जास्त उत्साही झाल्यामुळे त्यांच्या हृदयाचा रक्तपुरवठा  बंद झाल्यामुळे त्यांना अटॅक आल्याचं कारण समोर येत. 

केके यांच्या मृत्यूची 5 कारण…
1. केके यांच्या हृदयाच्या डाव्या बाजूला 80 टक्के ब्लॉकेजेस होते. शिवाय इतर ठिकाणी देखील छोटे-छोटे ब्लॉकेजे आहेत. 

2. लाईव्ह शोमध्ये केके स्टेजवर फिरत आणि डान्स करत होते.  त्यामुळे ते जास्त उत्साही झाले. हृदयाचा रक्तपुरवठा  बंद झाल्यामुळे त्यांना अटॅक आल्याचं कारण समोर येत. 

3. रक्तपुरवठा बंद झाल्यामुळे केके यांच्या हृदयाचे ठोके अनियमित झाले. म्हणून केके बेशुद्ध पडले.

4. रक्त पुरवठा थांबणं हेच कार्डिएक अटॅकचं मुख्य कारण आहे. 

5. कार्डिएक अरेस्टवेळीच जर केके यांनी सीपीआर दिला असता, तर केके आज आपल्यात असते. 

दरम्यान, केके यांच्या निधनानंतर फक्त बॉलिवूडलाचं नाही, तर चाहत्यांच्या मनात देखील एक पोकळी तयार झाली आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *