Headlines

kishori pednekar replied to shrikant shinde letter to uddhav thackeray on dasara melava speech spb 94

[ad_1]

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवाचा उल्लेख केल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून संताप व्यक्त केला होता. “ज्या डोळ्यांत फक्त आणि फक्त निरागसता भरलेली आहे, असे डोळे खुर्चीकडे लागलेले आहेत, असं वक्तव्य करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही का?,” अशी विचारणा श्रीकांत शिंदे यांनी केली होती. दरम्यान, श्रीकांत शिंदेंच्या या पत्राला शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा – ठाकरे पिता-पुत्रामध्ये मतभेद; वडील शिंदे गटासोबत, तर मुलाचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा!

काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?

“दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी अगदी प्रांजळपणे हे सांगितलं की सर्व पदं तुमच्या घरात का द्यायची? आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. श्रीकांत शिंदे खासदार आहेत. उद्या चालून नातवालाही नगरसेवक बनवण्याची शिंदे यांची महत्त्वकांशा असेल, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं. मात्र, त्याचा संदर्भ आणि मागची पुढची कोणतीही वाक्य न घेता, त्यांच्यावर टीका सुरू आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी त्या लहान मुलाला मोठा होऊ, शिकू देत, असे आशीर्वादही दिले आहेत. त्यामुळे वडिलांचं हृदय जागं झालं असे म्हणणे म्हणजे पुन्हा एकदा भावनिक होऊन लोकांमध्ये भ्रम निर्माण करायचा हा प्रकार आहे”, असे प्रत्यत्तुर किशोरी पेडणेकर यांनी श्रीकांत शिंदे यांना दिले आहे.

“जर उद्धव ठाकरेंच्या एका वाक्याने तुमचं वडिलांचं हृदय जागं झालं असेल तर ज्या आदित्य ठाकरेंबरोबर तुमचे मैत्रीचे संबंध होते. जेव्हा त्यांच्यावर सुशांतसिंह प्रकरणात घारणरडे आरोप लावण्यात आले. तेव्हा उद्धव ठाकरेंना वडील म्हणून उद्धव ठाकरेंना काय वाटलं असेल, याचा विचार तुम्ही केला का? तेव्हा तुम्ही एक शब्दतरी बोललात का? ज्या उद्धव ठाकरेंना पायउतार करून तुम्ही सत्तेत बसलात, त्यांच्या वडिलांना म्हणजेच बाळासाहेबांना काय वाटलं असेल, याचा विचार तुम्ही केला का?” असा प्रश्नही त्यांनी श्रीकांत शिंदेंना विचारला आहे.

श्रीकांत शिंदेंनी पत्रात काय म्हटले होते?

“महाराष्ट्रानं जे पाहिलं आणि तुमच्या तोंडून जे ऐकलं त्याची दखल घेऊन अत्यंत व्यथित मनानं आज तुम्हाला हे पत्र लिहीत आहे. हे पत्र माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘खासदार मुला’चं नाही; हे पत्र आहे रुद्रांश श्रीकांत शिंदे या दीड वर्षाच्या निरागस, चिमुकल्याच्या ‘बापा’चे आहे. उद्धवजी, ज्या डोळ्यांत फक्त आणि फक्त निरागसता भरलेली आहे, असे डोळे खुर्चीकडे लागलेले आहेत, असं वक्तव्य करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही का? मुख्यमंत्री असताना स्वतःला ‘कुटुंबप्रमुख’ म्हणवत होतात, मग कुटुंबप्रमुख असा कोवळ्या जिवांचा बाजार मांडणारा असतो का”, असा प्रश्न श्रीकांत शिंदे यांनी पत्राद्वारे विचारला होता.

हेही वाचा – “मोहन भागवतांनीच पापक्षालन करावं, नराधमांच्या हाती हिंदू..”, ‘त्या’ विधानावर ब्राह्मण महासंघाचं टीकास्र!

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातील भाषणात एकनाथ शिंदे यांच्या नातवाचा उल्लेख करत त्यांच्या कुटुंबाला लक्ष्य केले होते. “बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि नातू आता नगरसेवक पदावर डोळे लावून बसला आहे. त्याला मोठं तर होऊ द्या,” असा उल्लेख उद्धव यांनी आपल्या भाषणात केला होता.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *