Headlines

kishori pednekar reaction on raj thackeray letter to devendra fadnavis andheri election spb 94

[ad_1]

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहीत अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपाने माघार घ्यावी, असे आवाहन केले आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरेंच्या पत्रामुळे तरी भाजपाला आपल्या संस्कृतीची आठवण होईल, असा खोचक टोला त्यांनी भाजपाला लगावला आहे.

हेही वाचा – Andheri Bypoll: राज ठाकरेंनी अंधेरी निवडणूक न लढवण्याची विनंती केल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

नेमकं काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?

“गेल्या एका महिन्यापासून राज्यात अंधेरी पोटनिवडणूक आणि ऋतुजा लटके यांच्या उमेवारीचा विषय सुरू आहे. मात्र, राज ठाकरे यांना एक महिन्यानंतर हे पत्र लिहिले आहे. पण उशीरा का होईना, राज ठाकरेंच्या या पत्रानंतर भाजपाला कळलं असेल की आपण आपल्या संस्कृतीचा किती ऱ्हास करतो आहे. किमान या पत्रामुळे तरी आपल्या संस्कृतीची आठवण होईल”, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. तसेच भाजपाने कोणताही घेऊ देत, आम्ही रणशिंग फुकले आहे”, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा – Andheri Bypoll: “आम्ही काय निर्णय घ्यावा, हे…”, निवडणूक लढवू नका सांगणाऱ्या राज ठाकरेंच्या पत्रावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया

राज ठाकरेंनी फडणवीसांना काय आवाहन केले?

“दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. या जागेवर रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. ऋतुजा लटके या आमदार झाल्यास रमेश लटके यांच्या आत्म्याला शांती मिळेल. माझी विनंती आहे की, भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावं,” असे आवाहन राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *