Headlines

आठ महिन्याच्या गर्भवती पत्नीकडे शारिरीक सुखाची मागणी करणाऱ्याला पतीने चाकूने भोसकलं, नवी मुंबईत एकच खळबळ | husband stabs the person who demands sexual favour from pregnant wife sgy 87

[ad_1]

गर्भवती पत्नीकडे शारिरीक सुखाची मागणी केल्याने संतापलेल्या पतीने चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. नवी मुंबईत ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. ३० वर्षीय महिला आशा सेविका आहे. कमलाकर भगत असं ५६ वर्षीय पीडित व्यक्तीचं नाव आहे.

कमलाकर भगत याने महिलेकडे फोन क्रमांक मागितला होता. आरोग्याशी संबंधित काही काम असल्याने क्रमांक मागत असवा असं वाटल्याने महिलेनेही तो दिला. पण यानंतर त्याने फोन करुन महिलेकडे शारिरीक सुखाची मागणी केली. महिलेच्या पतीला जेव्हा या गोष्टीची माहिती मिळाली तेव्हा त्याने चाकूने भगवतर हल्ला केला.

नेमकं काय झालं?

बुधवारी, पनवेलमधील निवासी असलेली महिला मेडिकलमध्ये जात असताना भगत याने त्यांची भेट घेत फोन क्रमांक मागितला. पनवेल पालिका रुग्णालयात कामाला असल्याने त्याचं तिथे काहीतरी काम असावं असं वाटल्याने महिलेने आपला क्रमांक दिला. काही वेळाने भगत याने महिलेला फोन करुन तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा फोन करा म्हणून सांगितलं. महिलेने फोन केला असता त्याने शरिरसुखाची मागणी केली आणि त्याबदल्यात पैसे देतो असं सांगितलं.

महिलेने यावेळी त्याला आपल्या वयाकडे बघा आणि पुन्हा करु नका असं सुनावलं. महिलेने हा सगळा घटनाक्रम आपल्या पतीला सांगितला. भगत याने पुन्हा फोन केला नाही, पण या घटनेने पतीचा मात्र संताप झाला होता. भगत एका को-ऑपरेटिव्ह बँकेत शिपाई म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाली. त्याने फोन करुन त्याला पटेल रुग्णालयाजवळ बोलावलं.

भेट झाल्यानंतर आरोपी पतीने भगतकडे जाब विचारला असता भांडणाला सुरुवात झाली. यानंतर त्याने चाकू काढला आणि भगतवर वार करत जखमी केलं. भगतचा मृत्यू झाला आहे असं त्याला वाटलं आणि त्याने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीला राग अनावर होत असल्याने त्यातूनच हा हल्ला झाला. भगत याची प्रकृती सध्या गंभीर असून, आरोपी पोलीस कोठडीत आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *