Headlines

‘आमीरला विचार, त्याने तर बलात्कार…’ Animal ला ‘दुष्प्रवृत्ती’ म्हणणाऱ्या किरण रावला संदीप रेड्डी वांगाने सुनावलं

[ad_1]

Sandeep Reddy Vanga on Kiran Rao: रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) प्रमुख भूमिका असणारा अॅनिमल (Animal) चित्रपट गतवर्षीचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला आहे. या चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले असून, रणबीर कपूरला करिअरमधील सर्वात मोठा सुपरहिट दिला आहे. पण या चित्रपटावर होणारी टीका अद्यापही कायम आहे. नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चित्रपटातील दृश्यं, डायलॉग यावर पुन्हा एकदा आक्षेप घेतला जात आहे. आमीर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावनेही चित्रपटावर टीका केली असून, हा दुष्प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारा असल्याचं म्हटलं आहे. 

अॅनिमल (Animal) चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्यात महिलांचा अपमान करण्यात आला असून, पुरुषी मानसिकतेचा प्रचार केल्याची टीका होत आहे. दरम्यान चित्रपटाचा दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डीने आमीर खानची पत्नी किरण रावने केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. ‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत संदीप रेड्डीने किरण रावचा उल्लेख न करता तिला सुनावलं आहे. तिने आधी आपला पती आमीर खानचा ‘दिल’ चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला आहे. कशाप्रकारे आमीर खान अभिनेत्रीला बलात्काराची धमकी देतो आणि अखेरीस प्रेमात पडतो हे तिने सांगावं असं संदीप रेड्डी म्हणाला आहे. 

संदीप रेड्डीने काय म्हटलं आहे?

“आज सकाळी माझ्या असिस्टंट डायरेक्टने एक लेख दाखवला. एका सुपरस्टारच्या दुसऱ्या एक्स-पत्नीचा त्यात उल्लेख होता. तिच्या मते ‘बाहुबली 2’ आणि ‘कबीर सिंग’सारखे चित्रपट दुष्प्रवृत्ती आणि पाळत ठेवणे यासारख्या गोष्टींचं समर्थन करत आहेत. मला वाटतं तिला स्टॉकिंग आणि अप्रोचिंग यातील फरक कळत नाही. जेव्हा लोक हे संदर्भाविना वाचतात, तेव्हा त्यांनाही हे पटतं. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे,” असं संदीप रेड्डीने म्हटलं.

‘जाऊन आमीर खानला विचार’

पुढे बोलताना त्याने आपल्याला या टीकेमागील कारण समजत नसल्याचं म्हटलं. “मला त्या महिलेला सांगायचं आहे की, तिने आमीर खानला जाऊन विचारावं की, ‘खंबे जैसे खडी है, लडकी है या फुलजडी है’ हे काय होतं? त्यानंतर माझ्याकडे यावं. जर तुम्हाला ‘दिल’ चित्रपट आठवत असेल तर त्यात तिची चूक आहे हे दाखवण्यासाठी तो जवळपास बलात्कार करायला घेऊन जातो. यानंतर त्यांच्यात प्रेम होतं. हे नेमकं काय होतं? आपला सभोवताल पाहण्याआधी हे टीका का करतात ते समजत नाही”.

ॲनिमल चित्रपटात एक बाप आणि मुलामधील नातं आणि त्यातून येणारं संकट दाखवण्यात आलं आहे. भावनिकदृष्ट्या दूर असलेल्या वडिलांच्या हत्येचा प्रयत्न केल्यानंतर तो अमेरिकेतून परत येतो. यानंतर आपलं अस्तित्व निर्माण करताना तो हिंसाचाराच्या सगळ्या सीमा गाठतो. या चित्रपटात बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना, तृप्ती डिमरी आणि शक्ती कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *