Headlines

Khakee: The Bihar Chapter वेबसीरीजमुळे चर्चेत आले आयपीएस अमित लोढा आहेत कोण? जाणून घ्या 10 गोष्टी

[ad_1]

Khakee: The Bihar Chapter : वेबसीरीज विश्वात सध्या खाकी : द बिहार चॅप्टर (Khakee: The Bihar Chapter) या सीरीजची खुप चर्चा आहे. ही सीरीज बिहार डायरीज या पुस्तकावर बनवण्यात आली आहे. या सीरीजमधील आयपीएस अमित लोढा (IPS officer Amit Lodha) यांची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खुप आवडली आहे. त्यामुळे खऱ्या आयुष्यात गुंड चंदन महतोच्या मुसक्या आवळणारा आयपीएस अमित लोढा (Amit Lodha) आहेत तरी कोण? तसेच त्यांनी त्यांच्या करिअरची सूरूवात कशी केली? यासह इतर अनेक गोष्टी जाणून घेऊयात 10 मुद्दयातून…

‘हे’ आहेत 10 मुद्दे 

अमित लोढा (Amit Lodha) यांचा जन्म जयपूरमध्ये झाला आहे. अमित लोढा यांनी आयआयटी दिल्लीमध्ये शिक्षण घेतले होते, आणि पहिल्याच प्रयत्नात इंटरेन्स परीक्षा पास केली होती. 

आयआयटीमध्ये अमित लोढा (IPS officer Amit Lodha) यांचा अनुभव फार वाईट होता. एका मुलाखतीत ते म्हणाले होते, त्यांच्यासाठी हे आयआयटीच विश्व बनल नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्यासाठी आयआयटीचा काळ खुपच वाईट होता. 

आयआयटी जीवनातील अस्वस्थतेने त्यांना यूपीएससीकडे ढकलले आणि 1988 मध्ये ते आयपीएस अधिकारी झाले.

बिहारमध्ये पोस्टिंग होण्यापूर्वी ते राजस्थानमध्ये होते. 

अवघ्या काही दिवसांत ते लोकांचे आवडचे आयपीएस बनले होते. तसेच ते लोकांमध्ये इतके मिसळले की, त्यांना त्यांच्या लँडलाइन नंबरवर थेट कॉल करण्यास सांगायचे. 

‘शेखपुराचा गब्बर सिंग’ प्रकरणाने अमित लोढा राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले होते. अमित लोढा यांनी कुख्यात महतो टोळीच्या (पिंटू महतो, अशोक महतो) मुसक्या आवळल्या होत्या. या आरोपींवर दोन पोलिसांची आणि 15 जणांची हत्या केल्याप्रकरणाचे गुन्हे दाखल होते. 

अमित लोढा (IPS officer Amit Lodha) यांना त्यांच्या पोलीस कारकिर्दीतील अनेक ऑपरेशन्ससाठी प्रतिष्ठित राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्यासाठी पोलीस पदक आणि अंतर्गत सुरक्षा पदक प्रदान करण्यात आली होती. 

सध्या ४८ वर्षीय आयपीएस अधिकारी बिहारचे आयजीपी (पोलीस महानिरीक्षक) (IPS officer Amit Lodha) आहेत.

अमित लोढा (Amit Lodha) यांनी महतो याचा पाठलाग करून त्य़ाला अटक केले होते. मात्र बिहार डायरीज (2018) (Bihar Diaries) या पुस्तकात त्यांनी महतोचे नाव घेतले नाही आहे. खाकी द बिहार चॅप्टर ही वेबसीरीज याच पुस्तकावर आधारीत आहे.  

2021 मध्ये प्रकाशित झालेले लाइफ इन द युनिफॉर्म हे लोढा यांचे दुसरे पुस्तक आहे ज्यात त्यांनी UPSC पर्यंतचा त्यांचा प्रवास सांगितला आहे.

दरम्यान खाकी : द बिहार चॅप्टर (Khakee: The Bihar Chapter) ही सीरीज प्रेक्षकांना खुप आवडली आहे. या सीरीज मधील प्रत्येक पात्र आणि स्टोरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.त्यामुळे या वेबसीरीजची खुप चर्चा आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *