Headlines

IND vs BAN Test Series : कर्णधार KL Rahul घेणार मोठा निर्णय; 3 नव्या चेहऱ्यांना देणार टेस्ट टीममध्ये एन्ट्री

[ad_1]

IND vs BAN Test Series : टीम इंडिया (Team India) सध्या बांगलादेशाच्या दौऱ्यावर आहे. वनडे सिरीजनंतर (IND vs BAN ODI Series) टीमला 2 सामन्यांची टेस्ट सिरीज देखील खेळायची आहे. टीम इंडिया बांगलादेशाच्या (IND vs BAN) धर्तीवर वनडे सिरीज हरल्यानंतर आता सर्वांचं लक्ष आता टेस्ट सिरीजकडे (IND vs BAN Test Series) असणार आहे. अशातच टीम इंडियाचे पाच खेळाडू वनडे सिरीजमध्ये जखमी (Five Players injured) झाल्याने टेन्शन वाढलंय. त्यामुळे बीसीसीआयला बांगलादेशमध्ये खेळण्यात येणाऱ्या टेस्ट सिरीजसाठी अनेक बदल करावे लागणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने (BCCI) दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी नव्या खेळाडूंना जागा दिली आहे. 

IND vs BAN: टेस्ट टीममध्ये झाले मोठे बदल

भारतीय टीमला बांगलादेशाविरूद्ध 2 टेस्ट सामन्यांची सिरीज खेळायची आहे. ही सिरीज 14 तारखेला चट्टोग्रामच्या जहूर अहमद चौधरी स्टेडियममध्ये खेळली जाईल. मात्र या सिरीजपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. टीममधील पाच खेळाडू दुखापतीमुळे बाहेर झाले असून ते टेस्ट टीमचा हिस्सा नसणार आहेत. यासाठीच भारतीय क्रिकेट बोर्डाने टेस्ट टीममध्ये नव्या खेळाडूंना जागा दिली आहे.

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने 3 खेळाडूंना टीममध्ये सामिल केलं आहे. अभिमन्यु ईश्वरण, सौरभ कुमार आणि जयदेव उनादकट यांना टेस्ट टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे. मात्र यासंदर्भात अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

टेस्ट सिरीजविरूद्ध संभाव्य टीम इंडिया

केएल राहुल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, अभिमन्यु ईश्वरन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, सौरभ कुमार, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज, उमेश यादव

12 वर्षानंतर Team India त पुनरागमन करणार ‘हा’ खेळाडू

भारतीय संघाने टेस्ट सिरीजसाठी जखमी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) जागी एका अशा खेळाडूला संधी दिली आहे जो आपला शेवटचा कसोटी सामना 12 वर्षांपूर्वी खेळला होता.  शमी अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने त्याच्या जागी जयदेव उनाडकत (Jaydev Unadkat) याला बांगलादेशला पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. जयदेव उनाडकत 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यावर आपला पहिला व अखेरचा कसोटी सामना खेळला होता. तसेच त्याने भारतीय संघासाठी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना चार वर्षांपूर्वी खेळला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *