Headlines

Kartik Amavasya 2022: दिवाळीच्या रात्री हा उपाय केला तर धन देवता होईल प्रसन्न, सर्व समस्यांपासून होईल सुटका

[ad_1]

Diwali Upay 2022: आली माझ्या घरी आनंदाची दिवाळी, असे आपण या सणात म्हणत असतो. दिवाळीमुळे आपला आनंद अधिक द्विगुणीत  होतो. दिवाळी हा सण प्रकाशाचा सण म्हणून साजरा केला जातो. दिवाळीचा सण कार्तिक महिन्याच्या अमावास्येला साजरा केला जातो. हा वर्षातील सर्वात मोठ्या अमावास्येपैकी एक आहे. या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करण्याचा नियम आहे. या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक पूजा करतात आणि विधी करतात. तसेच काही उपाययोजनाही केल्या जातात. जेणेकरुन आईचे आशीर्वाद वर्षभर राहतील. माता लक्ष्मीच्या कृपेने धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. त्यामुळे दिवाळीच्या रात्री हा उपाय केला तर धन देवता होईल प्रसन्न आणि तुमची सर्व समस्यांपासून सुटका होईल.

एकीकडे दिवाळीचा सण आणि दुसरीकडे कार्तिक अमावास्या. प्रत्येक महिन्याच्या अमावास्येला ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. पण कार्तिक महिन्याची अमावस्या अधिक खास असते. अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी या दिवशी अनेक उपाय केले जातात. जर तुम्हीही आजार, दु:ख आणि कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांनी त्रस्त असाल तर दिवाळीच्या दिवशी हे उपाय केल्यास समस्यांपासून मुक्ती मिळते.

हे उपाय कार्तिक अमावस्येला केल्यास भरभराट

– ज्योतिष शास्त्रामध्ये कार्तिक अमावस्या ही मोठी अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी केलेल्या काही उपायांनी व्यक्तीचे दुःख आणि अडथळे दूर होतात. या दिवशी गरीब आणि गरजूंना अन्नदान करा आणि दक्षिणा द्या. असे केल्याने अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही.  

– जे लोक मानसिक आणि शारीरिक व्याधींनी त्रस्त आहेत त्यांनी कार्तिक अमावस्येच्या दिवशी महामृत्युंजयाचा जप करावा. 

– आर्थिक संकटातून जात असलेल्या लोकांनी अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूचे नामस्मरण करावे आणि नाम घेताना पीठाच्या 108 गोळ्या कराव्यात. या गोळ्या माशांना दिल्यास त्याचा परिणाम लवकरच दिसून येईल. 

-अमावास्येला मुंग्यांना गोड पिठ खाऊ घातल्यास पापकर्म नाहीसे होतात, असे मानले जाते. व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. 

– एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असल्यास अमावास्येला स्नान करून चांदीच्या नाग-नागिनीला वाहत्या पाण्यात पांढरी फुले वाहल्यास कालसर्प योग दूर होतो. 

– दिवाळीच्या संध्याकाळी घरातील ईशान कोपऱ्यात बसून धाग्यापासून दिवा बनवा आणि तुपात टाकून दिवा लावा. दिव्यामध्ये थोडे केशर किंवा हळद टाका, यामुळे व्यक्तीची आर्थिक समस्या दूर होईल. 

– नोकरी धोक्यात आली असेल किंवा तुम्ही बेरोजगार असाल तर दिवाळीच्या दिवशी एक लिंबू स्वच्छ करून मंदिरात ठेवा. हे लिंबू सकाळी मंदिरात ठेवा आणि रात्री बेरोजगार व्यक्तीचे डोक्यावरुन काढा, असे 7 वेळा करा. त्यानंतर 4 भाग करा. यानंतर चौरंगावर चारही दिशांना एक एक करून फेकून द्या. 

– कार्तिक अमावस्येला गंगा स्नान करावे. शक्य नसल्यास आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे. या दिवशी दानाचेही विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते.दिवाळीच्या दिवशी हनुमान स्त्रात पठण करा.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *