Headlines

कार्तिक आर्यनच्या नाकाची सर्जरी? मैत्रिणीच्या लग्नात मोठ्या रूबाबात आलेला अभिनेता वाईटरीत्या ट्रोल

[ad_1]

Kartik Aryan Trolled: अभिनेता कार्तिक आर्यन हा सध्याचा आघाडीचा अभिनेता आहे. त्याची चर्चा अनेकदा होताना दिसते. गेल्या काही वर्षांमध्ये कार्तिक आर्यनची चांगलीच चर्चा रंगली आहे. इंडस्ट्रीच्या बाहेरून आला असला तरी कार्तिकनं आपली ओळख ही आता ‘स्टार’ या श्रेणीत झाली आहे. मागच्या वर्षी आलेल्या ‘भुलभुलैया 2’ या चित्रपटानं तर मोठ्या संख्येने कार्तिक आर्यनच्या लोकप्रियतेत वाढ केली. आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती म्हणेज ‘भुलभुलैया 3’ ची. हा चित्रपटही काही दिवसांतच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या त्याच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाच्या ट्रेलरनं जनमानसात चांगलीच चर्चा आहे. नुकताच कार्तिक आर्यन एका लग्नासाठी पोहचला होता परंतु त्याला पाहून नेटकऱ्यांनी मात्र त्याला ट्रोल केलं आहे. 

कार्तिक आर्यनचा ‘प्यार का पंचनामा’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्याच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही तूफान कमाई केली होती. याच चित्रपटापासून त्यांची बॉलिवूडमध्ये खऱ्या अर्थानं एन्ट्री झाली होती. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा झाली. या चित्रपटातील को-स्टारच्या लग्नात कार्तिक आर्यन पोहचला परंतु त्याला वाईटरित्या ट्रोल करण्यात आले. त्याच्या आऊटफिटवर ते चाहते फिदा झाले परंतु त्याच्या चेहऱ्याकडे पाहून चाहते कन्फ्यूज झाले. अनेकांना त्यानं नाकाची सर्जरी केली आहे की काय इथपर्यंत प्रश्न विचारले. त्याचा बदलला लुक चाहत्यांना जाणवला आणि त्यांनी त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं. अभिनेत्री सोनाली सहेगलचे यावेळी लग्न थाटात पार पडले. 

हेही वाचा –  आगामी चित्रपटासाठी कार्तिक आर्यननं घेतलं तगडं मानधन? आकाडा वाचून बसेल धक्का

हल्ली सेलिब्रेटी हे कुठेही स्पॉट झाले तरी ते ट्रोल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची बरीच चर्चा रंगलेली दिसते. यावेळी कार्तिक आर्यन निशाण्यावर होता. यावेळी ट्रोलर्सनं कार्तिक आर्यनला पाहून त्यानं नाकाची सर्जरी केली आहे. हा म्हणत ट्रोल केले. तर एका युझरनं लिहिलंय की, हा तर एलियन वाटतोय. दुसऱ्यानं लिहिलंय, केसही गेले आणि उंचीही. तर तिसऱ्यानं लिहिलंय की, लाईटसारखा वाटतोस. तर अशाच एका ट्रोलरनं लिहिलंय की, लो बजेट कार्तिक आर्यन आहे हा तर. 

kartik aaryan attending sonali seygall’s wedding
by u/Iamrandom17 in BollyBlindsNGossip

सध्या सोशल मीडियावर त्यांच्या या ट्रोलिंगची खूपच चर्चा होताना दिसते आहे. त्यामुळे सगळीकडे कार्तिक आर्यनचीच चर्चा आहे. सोनाली सहेगलनं आपल्या लग्नाचे फोटोही शेअर केले आहेत. कार्तिक आर्यनचेही फोटो यावेळी व्हायरल झाले आहेत. यावेळी लग्नाला शमा सिंकदर, सनी सिंह, लव रंजन, राय लक्ष्मी, सुमोना चक्रवर्ती अशा अनेक बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *