Headlines

Instagram : इन्स्टाग्रामवर फॉलोवर्स वाढवायचे आहेत? ‘या’ ५ सोप्या स्टेप्स करा फॉलो

[ad_1]

​सर्च फ्रेंडली यूजरनेम

​सर्च फ्रेंडली यूजरनेम

सर्वात महत्त्वाची आणि सुरुवातीची गोष्ट म्हणजे कधीही युजरनेम हे अगदी सर्च फ्रेंडली ठेवावं. कारण जर तुम्ही इन्स्टाग्रामचे सक्रिय वापरकर्ते असाल, तर तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर विचित्र नावांची प्रोफाइल भेटली असेल. ही प्रोफाइल नावे मनोरंजक वाटू शकतात परंतु इन्स्टाग्रामवर अशा नावांसह प्रोफाइल शोधणे अधिक कठीण आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला असे प्रोफाइल नाव ठेवावे लागेल, जे वापरकर्ते सहजपणे शोधू शकतील.

वाचाः ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान

​दमदार कंटेंट अपलोड करावा

​दमदार कंटेंट अपलोड करावा

Instagram वर तुम्ही जो कंटेट शेअर करता तो जितका मजेदार असेल तितकी त्याची पोहोच जास्त असेल. अशा परिस्थितीत, आपण मनोरंजक कंटेट तयार केला पाहिजे. कधीही मनोरंजक मार्गाने पण तथ्य सांगावं. कंटेट जितका चांगला असेल तितक्या वेगाने तुमचे फॉलोअर्स वाढतील. म्हणजे तुमचे फोटो किंवा रील असं काहीही ट्रेंडिंग असणं महत्त्वाचं आहे.

वाचा : Jio recharge : दिवसभर ऑनलाईन असता? आणि डेटा पुरत नाही, जिओचा खास डेटा बुस्टर पॅक, किंमत फक्त ६१ रुपये

आकर्षक कॅप्शन

आकर्षक कॅप्शन

तुम्ही कंटेटसोबतच तुमच्या पोस्टचं कॅप्शनही आकर्षक ठेवणं गरजेचं आहे. अनेक वेळा कॅप्शनमध्ये लिहिलेल्या दोन ओळी वापरकर्त्यांना खूप आकर्षित करतात. याच्या मदतीने ते तुमचे अकाउंट फॉलो करू शकतात. इन्स्टाग्रामवर, वापरकर्त्यांना कॅप्शन लिहिण्यासाठी २२०० अक्षरांचा पर्याय मिळतो. अनेकदा तुम्ही लांब कॅप्शन लिहिले तरी चालू शकते.

वाचा : Battery Saver : तुमच्या स्मार्ट फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

​​ओरिजनल प्रोफाइल फोटो ठेवावा

​​ओरिजनल प्रोफाइल फोटो ठेवावा

तुम्हाला इन्स्टाग्रामवर अधिक फॉलोअर्स हवे असतील तर तुम्ही तुमचा मूळ फोटो म्हणजेच स्वत:चाच फोटो प्रोफाईल फोटो म्हणून ठेवावा. जर तुम्ही तुमच्या अकाऊंटमध्ये मूळ फोटो टाकला नाही तर इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना वाटू शकते की ते अकाउंट फेक असू शकते. अशा स्थितीत नेहमी मूळ म्हणजे स्वत:चा ओरिजनल फोटो ​प्रोफाइल फोटो म्हणून ठेवावा.

वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

​बिजनेस अकाउंट वापरावे

​बिजनेस अकाउंट वापरावे

तुम्हाला जर इन्स्टाग्रामवर फॉलोवर्स वाढवायचे असतील तर स्वत:च्या अकाउंटची असणाऱ्या, नव्याने येणाऱ्या फॉलोवर्सची माहिती मिळवण्यासाठी आपलं अकाउंट बिजनेस अकाउंट म्हणून बदलावं लागेल. बिजनेस अकाउंट सामान्य खात्यापेक्षा जास्त लांबपर्यंत पोहोचू शकतो. बिजनेस अकाउंटवर अधिकचे अनेक फीचर्स मिळतात

​वाचा : iOS 17 Update ने आयफोनचा चेहरामोहरा बदलणार, १० खास फीचर्सनी फोन होणार आणखी खास​

आणखी काही गोष्टींची काळजी घेणंही फायद्याचं

आणखी काही गोष्टींची काळजी घेणंही फायद्याचं

इन्स्टाग्रामवर युजर्सना एंगेज ठेवण्यासाठी दररोज कंटेट किंमान स्टोरीज तरी टाका. स्टोरीज हायलाइट फोल्डरमध्ये ठेवा. यासह तुम्ही हायलाइट थीम देखील डिझाइन करू शकता. यामुळे अकाउंट आणखी छान दिसेल, Instagram वर आपल्या मित्रांशी स्पर्धा करण्याऐवजी एकमेंकांना सपोर्ट करुन दोघांचे फॉलोवर्स वाढवा.कोणत्याही पोस्टसह जिओटॅगिंग करणे सुनिश्चित करा. त्यामुळे पोस्टाचा आवाका वाढण्याची शक्यता वाढते. ट्रेंडिंग हॅशटॅग निवडा आणि फक्त तेच हॅशटॅग वापरा जे तुम्हाला पोस्टशी संबंधित वाटतात.
तुमच्या पोस्टवर येणाऱ्या कमेंट्सना उत्तर द्या. कायम फॉलोवर्सशी जोडलेले राहा.

वाचा : घरबसल्या आधार कार्ड ‘फ्री’ मध्ये करा अपडेट, १५ जून २०२३ पर्यंत संधी, त्यानंतर मोजावे लागणार पैसे​

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *