Headlines

कधीकाळी IAS होण्याचं स्वप्न स्वप्नचं राहिलं…. टेलिव्हिजनवरील ‘या’ अभिनेत्रीची ती संघर्षमय कहाणी तुम्हाला माहितीये का?

[ad_1]

Rubina Dilaik: छोट्या पडद्यावर नेहमीच सुसंस्कृत सून आणि मुलगी म्हणून दिसणारी रुबिना दिलीक (Rubina Dilaik) खूपच बोल्ड आणि बिनधास्त आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे सुंदर आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. तिच्या हरएक पात्राला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. आज रुबिना तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे.

26 ऑगस्ट 1987 रोजी हिमाचलमध्ये जन्मलेली रुबिना दिलीक ही छोट्या पडद्यावरील मोठी स्टार आहे. 2006 मध्ये तिने मिस शिमला स्पर्धेत भाग घेतला आणि विजयाचा मुकुट पटकावला. रुबिनाला आयएएस (IAS) अधिकारी व्हायचे होते. त्यासाठी तिने तयारीही केली होती, पण ती अभिनेत्री झाली हा नशिबाचा खेळ होता. ‘छोटी बहू’ (Chooti Bahu) या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या शोमधील रुबिनाचा अभिनय सर्वांनाच आवडला होता. यानंतर तिने ‘सास बिना ससुराल’, ‘पुनर विवाह’, ‘देवों के देव महादेव’, ‘तू आशिकी’ सारख्या अनेक शोमध्ये काम केले आहे, या अभिनेत्रीला सर्वच शोमध्ये चांगलेच पसंती मिळाली आहे.

रुबिना दिलीकने टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो बिग बॉस 14 मध्ये भाग घेतला होता. तिचा पती अभिनव देखील या शोचा एक भाग होता. सगळ्यांना पराभूत करत रुबिना बिग बॉस 14 ची विजेती ठरली. 

रुबिनाने टीव्ही अभिनेता अभिनव शुक्लासोबत लग्न केले आहे. 21 जून 2018 रोजी दोघांचे लग्न झाले होते. रुबिना अनेकदा पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. रुबिनाचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत आणि ती तिच्या चाहत्यांना तिच्या नवीनतम फोटोंद्वारे मनोरंजन करत असते. लवकरच ती झलक दिखला जा 10 मध्येही दिसणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *