Headlines

कर्नाळा किल्ल्यावरील पर्यटन धोकादायक

[ad_1]

पनवेल : ऐतिहासिक कर्नाळा किल्ल्यावर पावसाळय़ात पर्यटकांची गर्दी होत असताना वन विभागावर प्रवेशबंदी करण्याची वेळ आली आहे. किल्ल्याची तटबंदी ढासळत असून सुळक्याकडे जाणारी वाटही निसरडी झाली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला असून महिनाभरात ही दुरुस्तीची कामे करण्यात येतील असे आश्वासन वन विभागाने दिले आहे. 

आठवडय़ातील शनिवार व रविवारी सातशेहून अधिक पर्यटक तर  सोमवारी ते शुक्रवारी तीनशेहून अधिक पर्यटक किल्याला भेट देत होते. किल्ल्यावर जाण्यासाठीच्या पायऱ्या व पाऊलवाट हरवत चालली आहे. यामुळे पर्यटक भटकण्याचे प्रसंगही घडले आहेत. त्यामुळे सुरक्षा उपाययोजना केल्यानंतरच हा किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे. तीन वर्षांपूर्वी हा किल्ला पुरातत्त्व विभागाने जाहीर नोटीस लावून हस्तांतरणाच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र करोनामुळे ही प्रकिया थांबली आहे. या संथगतीचा फटका किल्ला संवर्धनाच्या कामाला बसला आहे.

मुंबईपासून एक तासावर आणि पनवेल शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. किल्ल्यावरून मुरुड जंजिरा, अलिबाग, रायगड, घाटमाथा, मुंबईचे दर्शन होते. त्यामुळे पर्यटक भटकंतीसाठी जात असतात. पावसाळय़ातही मोठी गर्दी असते. त्याचप्रमाणे घनदाट झाडे आणि विविध जातीच्या पक्ष्यांचे वास्तव्य या ठिकाणी असल्यामुळे इतिहास, वन अभ्यासकही भेटी देत असतात. मुंबई, ठाणे, पुणेसह देशभरातील अनेक जण सुट्टी किंवा इतर दिवशी कर्नाळा अभयारण्यात येत असतात. सध्या किल्याचा बुरूज ढासळत असल्याने हा किल्ला पर्यटकांसाठी धोकादायक ठरला आहे. पर्यटनाला बंदी असल्याने पर्यटकांनीही किल्ल्याच्या संवर्धनाविषयी शासनाच्या उदासीन धोरणामुळे नाराजी व्यक्त केली आहे.

सुळका ढासळतोय 

अंगठय़ाच्या आकाराचा असलेला हा किल्ला अतिशय उंचावर आहे. तेथील तटबंदी ढासळत आहे, तर सुळक्याकडे जाणारी वाटही निसरडी झाली आहे. पायऱ्याही झिजल्या आहेत. एकंदरीत या वास्तूची डागडुजी न झाल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. रस्ता हरवून पर्यटक जंगलात भरकटत असल्याच्या घटनाही घडत आहेत. पुरातत्त्व विभागाने या किल्ल्याचे तातडीने सवंर्धन करावे, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *