Headlines

“हिंदवी उत्कर्षासाठी आणि…” ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून राज ठाकरेंचं हिंदू जनतेला आवाहन | Raj thackeray audio clip about membership of mns political party rmm 97

[ad_1]

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभासद नोंदणी मोहिमेला सुरुवात झाली आहे. गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यातून या मोहिमेला सुरुवात झाली. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी ऑडियो क्लिप जारी करत महाराष्ट्रातील जनतेला सदस्य होण्यासाठी आवाहन केलं आहे. हिंदवी उत्कर्षासाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सहभागी व्हा, असं आवाहन राज ठाकरे यांनी ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून केलं आहे.

संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये राज ठाकरे म्हणाले की, “माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… हिंदवी उत्कर्षासाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायमच कटिबद्ध आहे. आपलं कार्य अधिक व्यापक करण्यासाठी नव्याने सदस्य नोंदणी सुरू करण्यात आली आहे. माझं तुम्हाला आवाहन आहे की, तुम्ही तर सदस्य व्हायचंच आहे. पण इतरांनाही सदस्य करून घ्यायचं आहे.”

हेही वाचा- VIDEO: “राज ठाकरे RSS च्या वाटेवर” सचिन खरात यांचं टीकास्र, नेमकं काय म्हणाले?

“सदस्य होण्यासाठी ८८६०३००४०४ या क्रमांकावर मिस्डकॉल द्यायचा आहे. मिस्डकॉल दिल्यानंतर तुमच्या फोनवर एक लिंक येईल, त्यावर क्लिक केल्यास मोबाइल स्क्रिनवर एक फॉर्म दिसेल.तो फॉर्म भरून तुम्हाला सभासद व्हायचं आहे. आपण सगळे मिळून महाराष्ट्राला वैभवशाली शिखरावर घेऊन जाऊ… जगाला हेवा वाटेल, असा महाराष्ट्र घडवू…” असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.

हेही वाचा- पुण्यात मोबाईल दाखवत राज ठाकरेंनीच मानले मनसेचे आभार, कारण वाचून आश्चर्य वाटेल

गुरुवारी राज ठाकरे पुण्यात पोहोचल्यानंतर नवी पेठेतील शहर कार्यालयास भेट दिली होती. यावेळी ढोल ताशांच्या गजरात राज ठाकरे यांच स्वागत करण्यात आलं. यानंतर सर्वप्रथम राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सदस्य म्हणून नोंदणी करण्यात आली. त्यानंतर मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी राज ठाकरेंनी मिश्किलपणे आपल्याला सदस्य करुन घेतल्याबद्दल पक्षाचे आभार मानले. तसंच महाराष्ट्रातील नागरिकांना सभासद होण्यासाठी आवाहन केलं. त्यानंतर आज राज ठाकरेंनी एक ऑडिओ क्लिप जारी करत महाराष्ट्रातील जनतेला सदस्य नोंदणी करण्याचं आवाहन केलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *