Headlines

Johnny Depp जिंकला! निकाल ऐकवताच Ex Wife च्या चेहऱ्यावरचा रंग उडाला

[ad_1]

Johnny Depp wins defamation case: हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप आणि त्याची Ex Wife एम्बर हर्ड यांच्यामघ्ये सुरु असणारा खटला अखेर निकाली निघाला आहे. न्यायालयानं जॉनीच्या बाजूनं निकाल लावत एम्बरला झटका दिला आहे. जॉनीनं एम्बरच्या आरोपांमुळं आपलं झालेलं नुकसान आणि मलीन झालेली प्रतिमा पाहता तिच्याच विरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला होता. 

गेल्या काही दिवसांपासून हा खटला सुरु होता, ज्यामध्ये काही गंभीर आरोप- प्रत्यारोप केल्याचं पाहायला मिळालं. बरेच गौप्यस्फोटही झाले. पण, अखेर न्यायालयानं त्याच्या बाजुनं निकाल देत डेपला मोठा दिलासा दिला. 

डेपनं त्याच्या एक्स वाईफ एम्बर हिच्याकडून त्याची प्रतीमा मलीन झाल्याचं सिद्ध करुन दाखवलं आणि यामुळंच निकाल त्याच्या कलानं लागला. या निकालानंतर आता एम्बरकडून जॉनीला 15 मिलियन युएस डॉलर, म्हणजेच (जवळपास1,16,33,46,750 रुपये) देण्यात येणार आहेत. (Hollywood Actor Johnny Depp ex wins defamation case against ex wife amber heard)

गैरवर्तणुकीचा आरोप 
लग्नाआधी आणि लग्नानंतर जॉनीनं आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप एम्बरनं केला होता. कौटुंबीक हिंसा, हिंस्र शरीरसंबंध आणि अमली पदार्थांचतं सेवन करत वाद असे अनेक आरोप तिनं जॉनीवर लावले होते. 

2018 मध्ये दाखल केलेला खटला 
Pirates of the Carribean फेम अभिनेता जॉनी डेप यानं 2018 मध्ये ऑप-एड मध्ये फेयरफॅक्स काउंटी सर्किट न्यायालयात (Fairfax County Circuit Court) हर्डविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकणारा खटला दाखल केला होता. एम्बरनं आपलं नाव न घेता एक प्रसिद्ध व्यक्ती म्हणत प्रख्यात वर्तमान पत्रात आपली प्रतीमा मलीन करणारा लेख लिहिल्याचा आरोप त्यानं केला होता. 

तिथं 36 वर्षीय हर्डनं 100 मिलियन डॉलरचा खटला दाखल करत आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल न्यायालयाकडे दाद मागितली. पण, डेपनं मात्र कोणत्याही महिलेवर हात न उगारल्याची स्पष्ट भूमिका न्यायालयापुढे मांडली. एम्बरच नात्यामध्ये हिंसक होती असं सांगत त्यानं काही पुरावेही सादर केले होते. 

2015 मध्ये लग्न, प्रेमाचं नातं आता मात्र सूडात बदललं होतं 
न्यायालयानं खटल्याचा निकाल सुनावला, त्यावेळी जॉनी तिथं हजर नव्हता. पण, एम्बर मात्र तिथंच होती. यावेळी तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. निकाल कळताच तिथं जॉनीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्टही शेअर केली. 

डेप आणि हर्ड 2011 मध्ये ‘द रम डायरी’ (the rum diary) या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी भेटले होते. फेब्रुवारी 2015 मध्ये त्यांनी लग्नही केलं. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. दोन वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. 

प्रेमापासून सुरू झालेलं हे नातं अतिशय विचित्र वळणावर आलं, जिथं खासगीतल्या गोष्टीही सर्वांसमोर उघड झाल्या. नात्याला मिळालेलं हे वळण साऱ्या जगानं पाहिलं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *