Headlines

५० सक्रिय कार्यकर्ते जोडणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट देणार – जयंत पाटील | Jayant Patil say will give ticket to those worker who will make 50 active members of NCP in Amravati

[ad_1]

आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आत्ताच कामाला लागा. ५० सक्रिय कार्यकर्ते करणाऱ्यालाच नगरसेवक पदाच्या निवडणुकीत तिकीट दिलं जाईल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. ते अमरावतीत महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने आढावा बैठकीत बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, “अमरावती शहरात ८७ वार्ड पकडले आणि प्रत्येक वार्डातून एकाने ५० क्रियाशील सदस्य केले तरी आपण ५,००० सदस्य होतील. यासाठीची मोहीम तुम्ही सर्वांनी सुरू करावी. काही ठिकाणी कमी होतील. मात्र, इथं बसलेल्या प्रत्येकाने मनावर घेऊन २५-२५ क्रियाशील सदस्य करावेत.”

“तिकीट देण्याचा निकषच ५० क्रियाशील सदस्यांचा”

“ज्याला नगरसेवक व्हायचं आहे त्याला तर तिकीट देण्याचा निकषच ५० क्रियाशील सदस्यांचा ठेवुयात. यासाठी १० दिवसांचा वेळ आहे. एवढे क्रियाशील सदस्य आणि एका क्रियाशील सदस्यामागे १० प्राथमिक सदस्य या शहरात पक्ष वाढीसाठी करुयात. लोकांची इच्छा फार असते, आपण त्यांच्यापर्यंत जाऊन सांगितलं पाहिजे,” असं जयंत पाटलांनी सांगितलं.

हेही वाचा : “तुम्ही त्यावेळी थोडी घाई केली, जयंत पाटील असते तर ‘करेक्ट कार्यक्रम’…”, एकनाथ शिंदेंचा भर अधिवेशनात अजित पवारांना टोला

“अमरावती शहरात राष्ट्रवादीची चांगली संघटना निर्माण झाली”

संजय खोडके यांच्या नेतृत्वात अमरावती शहरात राष्ट्रवादीची चांगली संघटना निर्माण झाली आहे. आगामी महापालिकेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील असा विश्वास या निमित्ताने वाटतो, असंही जयंत पाटलांनी नमूद केलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *