Headlines

जालना प्राचीन मूर्ती चोरी प्रकरण; भाजपा आमदाराचा पोलिसांना इशारा, म्हणाले, “मूर्ती सापडल्या नाही तर…. “

[ad_1]

जालन्यातील जांब समर्थ येथील राम मंदिरातील सात पंचधातूंच्या मूर्ती चोरी गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. श्री समर्थ रामदास स्वामी पूजा करीत असलेल्या श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाच्या पंचधातुच्या मूर्ती चोरट्यांनी लंपास केल्या. मात्र, अद्याप चोरांचा तपास लागला नाही. यावरुनच भाजपा आमदार यांनी पोलिसांना इशारा दिला आहे.

हेही वाचा- तासगावचा ऐतिहासिक रथोत्सव उत्साहात

तर पोलिसांचा हिशोब करावा लागेल….

“जालन्यातील जांब समर्थ येथील राममंदिरातून चोरीला गेलेल्या मूर्ती सापडल्या नाही, तर पोलिसांचा हिशोब करावा लागेल”, असा इशारा लोणीकर यांनी पोलिसांना दिला आहे. परतूर तालुक्यातील सोयंजना येथे आयोजित करण्यात आलेल्या हरीकीर्तनाच्या कार्यक्रमात ते उपस्थित होते. त्यावेळेस त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

श्री राम, सितामाता, लक्ष्मण व हनुमान यांच्या पंचधातूच्या सहा मूर्ती होत्या.

ऐतिहासिक मंदिरातून पंचधातूच्या ६ मूर्तींची चोरी झाल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तीर्थक्षेत्र जांबसमर्थ हे श्री समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव आहे. जांबसमर्थ मंदिर, श्रीराम मंदिरात इ.स. १५३५ मधील श्री राम, सितामाता, लक्ष्मण व हनुमान यांच्या पंचधातूच्या सहा मूर्ती होत्या. विशेषत: श्री समर्थ रामदास स्वामी भिक्षा मागत असताना भिक्षापात्रात ठेवली जाणारी आणि हाताच्या दंडावर बांधली जाणारी हनुमानाची मूर्तीही या मंदिरात होती.

हेही वाचा- सोलापूरमध्ये चतुर्थीच्या दिवशीच पुरातत्त्व खात्याकडून गणपती मंदिरातील फरशीची तोडफोड, भाविकांचा आरोप

गावकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन

जांब समर्थ येथील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिरातील राम, लक्ष्मण आणि सीतेसह सहा पंचधातूंच्या प्राचीन मुर्त्यांची अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून चोरी केली. याप्रकरणी तपास व्हावा आणि भाविकांची श्रद्धा असलेल्या मूर्तींचा शोध घेण्यात यावा तसेच चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी गावकऱ्यांसह भाविकांनी केली होती. यासाठी अन्नत्याग आंदोलनही केले होते.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *