Headlines

जॅकलिन फर्नांडिस आणि रणवीर सिंगचं भांडण चव्हाट्यावर; सेटवरच मारहाण

[ad_1]

मुंबई : रणवीर सिंग स्टारर ‘सर्कस’ हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या सिनेमात रणवीरसोबत जॅकलीन फर्नांडिस, पूजा हेगडे आणि वरुण शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की, या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने रणवीरच्या कानशिलात लगावली होती. हा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.

 शूटवर जॅकलीनने रणवीर सिंगला का मारली कानशिलात?
एका वृत्तानुसार, जॅकलीन म्हणाली, “शूटच्या पहिल्या दिवशी मी एवढी घाबरली होती की, मी शॉटमध्ये वरुण आणि रणवीरच्या कानशिलात लगावली होती. मी इतकी घाबरली होती की, मी थप्पड सीन करण्या ऐवजी मी त्यांना खरोखर कानाखाली मारली.  आणि मग मला समजलं की, मी आइस ब्रोक केला. 

जॅकलिनच्या या खुलाशानंतर वरुण आणि रणवीरने मजेशीर पद्धतीने उत्तर दिलं आणि वरुण म्हणाला, ‘ जर तु त्याला बर्फ म्हणशील तर, यावर रणवीर म्हणाला, ‘हो त्याचा जबडा मोडला, ज्यासाठी मला बर्फाची गरज होती.’

या चित्रपटात रणवीर सिंगची दुहेरी भूमिका आहे
सर्कसबद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट आपल्याला 1960 च्या दशकात घेऊन जातो. या चित्रपटात रणवीर दुहेरी भूमिकेत आहे पण त्यांना एकमेकांच्या अस्तित्वाची माहिती नसते. या फॅमिली एंटरटेनरमध्ये वरुण शर्माही दुहेरी भूमिका साकारत आहे. सिम्बा (2018) आणि अक्षय कुमार-स्टार सूर्यवंशी नंतर रणवीर आणि रोहित यांनी तिसर्‍यांदा एकत्र काम केल्याचा ही सर्कस आहे.

रणवीर सिंग सध्या त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘सर्कस’ (Circus) सिनेमातून अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 23 डिसेंबर रोजी रणवीरचा ‘सर्कस’ रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *