Headlines

Ira Khan: चार दिवस उपाशी अन् ढसाढसा रडले; आमिर खानच्या लेकीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली….

[ad_1]

Aamir Khan’s daughter Ira Khan: बॉलीवूड अभिनेता आणि मिस्टर परफेक्ट आमिर खान (Aamir Khan) हिची मुलगी इरा खान हिने काही वर्षांपूर्वी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपण नैराश्य (depression) अवस्थेत असल्याचा खुलासा केला होता. क्लिनिकल डिप्रेशनमुळे पाच वर्षांपूर्वी इरावर उपचार केले जात होते. अशातच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत इरा खानने (Ira Khan Interview) खळबळजनक खुलासे केले आहेत.

वडील आमिरकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल इराने उघडपणे बोलणं पसंत केलंय. तिच्या कुटुंबात मानसिक आरोग्याच्या समस्यांचा इतिहास असल्याचा खुलासा देखील तिने केला आहे. डिप्रेशनमध्ये असताना मी अनेक तास काहीही कारण नसताना रडत होते. काही योग्य निर्णय न घेतल्याने मी डिप्रेशनचे शिकार झाले. दीर्घकाळ रडणं, उदास वाटणं आणि एका प्रसंगी चार दिवस न खाणं, असे बदल मला जाणवू लागले. त्यामुळे मी नेदरलँड्समधून भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. माझ्या आईने सांगितले की मला जगायचे नाही, म्हणून मी दिवसभर झोपेन जेणेकरून मला एका दिवसात जगण्यासाठी कमी तास असतील, असंही इरा म्हणाली.

दर आठ ते दहा महिन्यांनी माझ्यासोबत मोठा अपघात होणार होता. हे अंशतः अनुवांशिक, अंशतः मानसिक आणि अंशतः सामाजिक आहे. हे समजण्यासाठी मला थोडा वेळ लागला, परंतु माझ्या कुटुंबात मानसिक आरोग्य विकार चालतात, असंही इरा यावेळी म्हणाली आहे.

आणखी वाचा – लहाणपणीच शारीरिक शोषण पाहिले, पण प्रेमात…; Shahid kapoor चा मोठा खुलासा

इरा ही आमिरची पहिली पत्नी रीनापासूनची दुसरी मुलगी आहे. नुकतेच इराने नुपूर शिखरेसोबत लग्न केलं होतं. इरा खान हिचा काही दिवसांपूर्वीच नुपूर शिखरे याच्यासोबत मुंबईत साखरपुडा झाला होता. इरा खानने अलीकडेच फिटनेस ट्रेनर आणि तिचा होणारा नवरा नुपूर शिखरेसोबत काही फोटो शेअर केले होते.

दरम्यान, मिस्टर परफेक्ट आमिर खान (Aamir Khan) याने चित्रपटांपासून मोठा ब्रेक घेतलाय. लाल सिंह चढ्डा या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. शेवटी हा चित्रपट फ्लॉप गेल्याचं दिसून आलंय.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *