Headlines

IPL 2022 कडे क्रिकेट चाहत्यांची पाठ, नक्की कारण काय?

[ad_1]

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाचा (IPL 2022) हंगामा सुरु आहे. कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर क्रिकेट चाहत्यांना स्टेडियममध्ये एकूण क्षमतेच्या 50 टक्के चाहत्यांना उपस्थितीची परवानगी देण्यात आली. मात्र यानंतरही क्रिकेट चाहत्यांनी आयपीएल आणि बीसीसीआयला मोठा झटका दिला आहे. चाहत्यांनी आयपीएलकडे पाठ फिरवल्याचं समोर आलं आहे. (ipl 2022 huge drop in tv ratings for the 2nd week as well)

चाहत्यांमध्ये असलेली आयपीएलची क्रेझ ही कमी झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आयपीएलच्या 15 व्या मोसमाला 26 मार्चपासून सुरुवात झाली. मात्र पहिल्या आठवड्यानंतर सलग दुसऱ्या आठवड्यातही टीव्ही रेटिंगमध्ये घट झाली आहे.

पहिल्या आठवड्यात टीव्ही रेटिंगमध्ये 33 टक्क्यांनी घट झाली. तर यानंतर आता दुसऱ्या आठवड्यात 28 टक्के घट झाली आहे. 

पहिल्या आठवड्याच्या तुलनेत दुसऱ्या आठवड्यातील घट ही 5 टक्क्यांनी कमी झाली आहे. मात्र तरीही सातत्याने होणाऱ्या घटीमुळे चाहत्यांना आयपीएलमध्ये रस उरला नाहीये का, असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. 

टीव्ही रेटिंगमध्ये जवळपास 20-30 टक्क्यांनी घट 

InsideSport ने एका जाहिरातदाराच्या हवाल्याने म्हटलंय की, असं होईल याची अपेक्षा नव्हती. आयपीएलची टीव्ही रेटिंग अतिशय वाईट आहे. आयपीएल रेटिंगमध्ये आतापर्यंत इतकी घट झाली नव्हती. रेटिंगमध्ये जवळपास 20-30 टक्क्यांनी घट झाली आहे. आम्ही गेल्या मोसमाच्या तुलनेत 25 टक्के अधिक पैसे दिले आहेत. आम्ही याबाबत आधीच स्टार स्पोर्ट्ससह चर्चा केली आहे”. 

आयपीएल ब्रॉडकास्टर चॅनलच्या रॅंकिगमध्येही घट

साधारणपणे आयपीएल सुरु झाल्यावर सामन्याचं प्रक्षेपण करणाऱ्या वाहिन्या या टीआरपी रेटिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर असतात. मात्र यंदा असं झालेलं नाही. 

आयपीएलचं ब्रॉडकास्टिंग करणाऱ्या चॅनेलची तिसऱ्यास्थानी घसरण झाली आहे. यावेळेस पहिल्या क्रमांकावर सन टीव्ही पहिल्या तर मा टीव्ही दुसऱ्या स्थानी आहेत. 

तर हिंदीमध्ये स्टार स्पोर्ट्स् अव्वल स्थानी आहेत. तर दिल्लीत तिसरा आणि महाराष्ट्रात दुसरा क्रमांक आहे.

सलग दुसऱ्या वर्षी टीव्ही रेटिंगमध्ये घसरण

आयपीएल 2022 हंगामाच्या पहिल्या आठवड्यात, पहिल्या 8 सामन्यांमध्ये टीव्ही रेटिंग 2.52 इतकं होतं. आयपीएलच्या 14 व्या मोसमाशी तुलना केल्यास,  IPL 2021 च्या पहिल्या आठवड्यातील टीव्ही रेटिंग 3.75 इतकं होतं. यावेळी टीव्ही रेटिंगमध्ये 33% घसरण झाली. याआधी 2020 मध्ये आयपीएलच्या 13 व्या मोसमातील पहिल्या आठवड्यात टीव्ही रेटिंग 3.85 इतकी होती.  म्हणजेच सलग दुसऱ्यांदा रेटिंगमध्ये घसरण झाली आहे.

दर्शकांच्या संख्येतही घट

केवळ रेटिंगच नाही तर प्रेक्षक संख्येतही घट झाली. यावेळी पहिल्या आठवड्यात 14% कमी म्हणजेच 229.06 दशलक्ष लोकांनी (सर्व चॅनेलद्वारे) सामने पाहिले. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *