Headlines

IND vs SL: “लहानपणी माझी बॅटिंग पाहिली नसेल…”, Suryakumar Yadav च्या उत्तराने Rahul Dravid क्लिन बोल्ड!

[ad_1]

Rahul Dravid, Suryakumar Yadav: अखेरच्या सामन्यात श्रीलंकेचा (Sri Lanka) दारूण पराभव करत टीम इंडियाने (Team India) मालिका खिशात घातली आहे. कॅप्टन हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली भारताने सिरीज 2-1 ने जिंकली. विजयासाठी देण्यात आलेल्या 229 धावांचा पाठलाग करताना लंकेच्या फलंदाजांना मैदानात टिकता आलं नाही आणि 137 धावांवर संपूर्ण संघ गारद झाला. या सामन्यामध्ये स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) वादळी खेळी केली आणि धमाकेदार शतक (Century) ठोकलं. त्यामुळे सध्या सूर्याचीच चर्चा होताना दिसत आहे. (Suryakumar Yadav classy reply to Rahul Dravid marathi news)

वादळी शतकाच्या जोरावर सूर्यकुमार विजयाचा शिल्पकार ठरला. टी-ट्वेंटी इंटरनॅशनलमधील तिसरं शतक (Suryakumar Yadav 3rd Century) त्याने नावावर केलं. सामना झाल्यानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक राहूल द्रविड (Rahul Dravid) यांनी सूर्याची मुलाखत घेतली. त्यावेळी राहूल द्रविडने सूर्याला कैचीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सूर्याचं उत्तर पाहून ‘द वॉल’ राहूल द्रविड क्लिन बोल्ड झाल्याचं पहायला मिळालं.

आणखी वाचा – IND vs SL : तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती… सूर्यकुमार यादवसाठी केलेल्या ट्वीटमुळे गौतम गंभीर निशाण्यावर

द्रविड म्हणतो की, आज आपल्यासोबत एक जण आहे, जो तरुण युवा खेळाडू आहे. मी तुला लहानपणापासून खेळताना पाहत आलो आहे, तू मला तुमच्या लहानपणी फलंदाजी करताना पाहिलं होतं का?, असा सवाल विचारला. त्यानंतर ‘हो मी पाहिलंय’, असं सूर्याने उत्तर दिलं. त्यानंतर दोघेही हसायला लागतात. त्याचा व्हिडिओ (Video) सध्या तुफान व्हायरल होताना दिसतोय.

पाहा Video – 

दरम्यान, सूर्यकुमार यादव म्हणजे स्फोटक फलंदाज आणि राहूल द्रविड म्हणजे टेक्निकने खेळणारा खेळाडू… टी-ट्वेंटी (T20) आणि राहूल द्रविड (Rahul Dravid) या दोघांचा फार क्वचित संबंध येतो. त्यामुळे सूर्याच्या स्फोटक फलंदाजीवर बोलत असताना दोघांना हसू आवरलं नाही. फलंदाजी करताना मेंदू आणि मनगटाचा वापर करतो. नेटमध्ये चेंडू बॅटवर व्यवस्थित असेल तर तो सराव करतो, असंही सूर्या यावेळी म्हणाला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *