Headlines

Ind vs Lanka : हार्दिक, सूर्यकुमारवर जबाबदारी देण्यामागे हे आहे कारण? बीसीसाआयचा मोठा गेम उघड

[ad_1]

Ind vs Lanka : भारत आणि श्रीलंकेदरम्यान उद्यापासून टी20 मालिकेला (T20 Series) सुरुवात होत आहे. या मालिकेत तीन सामने खेळवले जाणार असून यातली पहिला टी20 सामना उद्या मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium, Mumbai) रंगणार आहे. नव्या वर्षात (New Year) होणारी ही पहिलीच क्रिकेट मालिका (Cricket Series) आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेल्या संघात बीसीसीआयने (BCCI) मोठे बदल केले आहेत. बीसीसीआयची ही मोठी खेळी आता समोर आली आहे.

बीसीसाआयची मोठी खेळी
रोहित शर्मानंतर (Rohit Sharma) के एल राहुलला (K L Rahul) टीम इंडियाच्या तीनही फॉर्मेटच्या कर्णधारपदाचा दावेदार मानलं जात होतं. पण गेल्या काही सामन्यात त्याची निराशाजनक कामगिरी पहाता तो या शर्यतीत आता मागे पडत चालला आहे. टी20 मालिकेसाठी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार आणि सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्माकडे कर्णधारपद कायम ठेवण्यात आलं आहे. एकदिवसीय संघात के एल राहुलची विकेटकिपर, फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. यावरुन राहुलला हा शेवटचा इशारा असल्याचं मानलं जात आहे. 

या मालिकेत केएल राहुलच्या कामगिरीत सुधारणा झाली नाही तर कदाचित आगामी मालिकेत त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. तर ऋषभ पंतलाही (Rishabh Pant) खराब कामगिरीमुळे बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पंतच्या जागी ईशान किशन (Ishan Kishan) आणि संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी देण्यात आली आहे. ईशानने बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) सामन्यात दुहेरी शतक करत टीम इंडियातलं (Team India) आपलं स्थान भक्कम केलं आहे.  

ईशान किशनने 2022 मध्ये 16 टी20 सामन्यात 476 धावा केल्या आहेत. यात तीन अर्धशतकांचं समावेश आहे. त्याचा स्ट्राईक रेट 127.95 इतका आहे. तर संजू सॅमसननेही जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली आहे तेव्हा तेव्हा आपल्या कामगिरीची छाप उमटवली आहे. गेल्या सहा सामन्यात संजूने 179 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 158.4 इतका आहे. सूर्यकुमार यादवनंतर हा दुसऱ्या नंबरचा स्ट्राईक रेट आहे. 

शुभमन गिलची जबाबदारी वाढली
शुभमन गिलला (Shubhaman Gill) आतापर्यंत कसोटी (Test) आणि एकदिवसीय संघात (ODI) स्थान मिळालं आहे, पण पहिल्यांदाच त्याचा टी20 संघात समावेश करण्यात आला आहे. के एल राहुलनंतर ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाडबरोबर (Ruturaj Giakwad) शुभमन गिलवरही सलामीचा फलंदाज म्हणून निवड समितीचं लक्ष असणार आहे. 

हे ही वाचा : 2022 मध्ये boycott trend चा फटका, 2023 मध्ये काय होणार? या चित्रपटांवर लागलेत बॉलिवूडचे 2500 कोटी रुपये

हार्दिक पांड्याला मोठी जबाबदारी देण्याची तयारी
आयपीएलमध्ये (IPL) पहिल्याच फटक्यात गुजरात जायंट्सला (Gujarat Titans) चॅम्पियन बनवणारा हार्दिक पांड्या टीम इंडियाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पहिला दावेदार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेत (India vs Sri Lanka T20 Series) हार्दिकला कर्णधार बनवणं हे पहिलं पाऊल मानलं जात आहे. शिवाय एकदिवसीय मालिकेतही के एल राहुलला डावलून हार्दिक पांड्याला उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. यावरुन के एल राहुल या शर्यतीत मागे पडल्याचं संकेत आहेत. 

विराट कोहलीने T20 संघाचं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केल्यानंतर त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरुनही हटवण्यात आलं. व्हाईटबॉलसाठी दोन कर्णधारांचा फॉर्मेट नसेल असं यावेळी सांगण्यात आलं होतं. 2023 हे वर्ष एकदिवसीय वर्ल्डकपचं वर्ष आहे. त्यामुळे रोहित शर्माला कर्णधारपदावरुन दूर करण्याचा मोठा डाव बीसीसीआय खेळणार नाही, पण आगामी काळात हार्दिकला ही जबाबदारी दिली जाईल हे निश्चित मानलं जात आहे. 

हे ही वाचा : चीनमध्ये परिस्थिती हाताबाहेर! कोरोनाच्या भीतीने तरुणाची इमारतीवरुन उडी, धक्कादायक Video

दुसरीकडे धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवला टी20 संघाचं उपकर्णधार बनवून बीसीसीआयने आणखी एक खेळी केली आहे. यावरुन येत्या काळात रोहित, विराट आणि केएल राहुलऐवजी युवा खेळाडूंवर जबाबादारी देण्याचे बीसीसीआयने संकेत दिले आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *