Headlines

Tunisha Sharma : तुनिषा शर्मा हिच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाचा मोठा खुलासा

[ad_1]

Tunisha Sharma : टीव्ही कलाकार आणि अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाचा मोठा खुलासा झाला आहे. तुनिषा हिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन काल पूर्ण झाले होते. (Tunisha Sharma Death) 5 डॉक्टर्सच्या पॅनेलकडून शवविच्छेदन करण्यात आले आहे. या अहवालातून तिच्या मृत्यूचे खरं कारण आले आहे. मुंबईतील  जे.जे. रुग्णालयात तुनिषा शर्माच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आले आहे.  (Tunisha Sharma News)

तुनिषा शर्माने शनिवारी संध्याकाळी अली बाबाच्या सेटवर मेकअप रुममध्ये आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या आरोपाखाली सहअभिनेता शीजान मोहम्मद खान याला अटक करण्यात आली आहे.  तुनिषा शर्मा हिच्या मृत्यूमुळे टीव्ही इंडस्ट्रीतील लोक अडचणीत सापडले आहेत. तुनिषा शर्माने वयाच्या 20 व्या वर्षी मृत्यूला कवटाळण्याचे कारण काय होते, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

तुनिषाच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाहीत?

दरम्यान, तुनिषा शर्मा हिच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाचा खुलासा झाला. तिचा श्वास कोंडल्यानेच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. फास लागल्यानेच तुनिषाचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. दरम्यान, तुनिषाच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाहीत, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तुनिषाच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाचा खुलासा झालाय.   

तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) हिने शनिवारी संध्याकाळी अली बाबाच्या सेटवर मेकअप रूममध्ये आत्महत्या केल्याचा आरोप आहे. आईने सहकलाकार शीझान खानवर गंभीर आरोप केलेत.आईच्या तक्रारीवरुन शीझानवर कलम 360 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुनिषाला आत्महत्येसाठी परावृत्त केल्याचा आरोप शीजानवर ठेवण्यात आलाय. शीझानसोबत ब्रेकअप झाल्यामुळे नैराश्येतून तुनिषाने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे.

करिअरची सुरुवात टिव्ही मालिकांमधून

तुनिषा शर्मा केवळ 20 वर्षांची होती. ‘भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप’ या टीव्ही मालिकेतून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर तिने चक्रवर्ती अशोक सम्राट’, ‘गब्बर पुंचवाला’, ‘शेर-ए-पंजाब : महाराजा रणजीत सिंह’, ‘इंटरनेट वाला लव’, ‘इश्क सुभानल्ला’मध्ये काम केले आहे. तुनिषाने अनेक हिंदी सिनेमात काम केले आहे. फितूर, बार बार देखो, कहानी 2आणि दबंग 3 – हे तिचे मुख्य चित्रपट आहेत. फितूर आणि बार बार देखो या चित्रपटांमध्ये तिने तरुणीच्या कतरिना कैफ हिची भूमिका साकारली होती. कहानी -2 मध्ये तुनिषा ही विद्या बालनची मुलगी म्हणून काम केले आहे तर दबंग 3 मध्ये तुनिषा एका छोट्या भूमिकेत दिसली होती.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *