Headlines

तुमच्या नकळत कोण वापरतंय Wi-Fi, असे करा माहित, लगेच करा ब्लॉक

[ad_1]

नवी दिल्ली:Wi-Fi Speed:अनेकदा वाय-फायचा स्पीड अचानक कमी होतो.अशात युजर्स डिव्हाइस तापसतात ते देखील नीट असते. मग असे का होते? तर यामागे एक कारण असू शकते. ते म्हणजे कुणीणीतरी तुमचे वाय-फाय चोरून वापरत असते. यामुळे बँडविड्थ कमी होते आणि नेटचा वेग कमी होऊ लागतो. पण, चांगली गोष्ट अशी की, कोणी तुमचे वाय-फाय वापरत आहे की, नाही हे तुम्ही शोधू शकता? एवढेच नाही तर तुम्ही त्यांना तुमचे इंटरनेट वापरण्यापासून ब्लॉक करू शकता आणि तुमचा जुना इंटरनेट स्पीड सहज मिळवू शकता.

वाचा: OnePlus चा पॉवरफुल 5G स्मार्टफोन झाला २२ हजारांनी स्वस्त, फोनचे फीचर्स लय भारी

कोणी Wi-Fi चा गैरवापर करत आहे हे कसे माहित करावे?

तुमचे वाय-फाय नीट काम करत असले तरी, इंटरनेट गुपचूप वापरणारे कोणी आहे की नाही हे माहित असे आवश्यक आहे . यासाठी सर्वप्रथम, तुमच्या घरी नेहमी पासवर्ड संरक्षित वाय-फाय असल्याची खात्री करा आणि फक्त तुमची उपकरणे त्या नेटवर्कशी कनेक्ट केलेली आहेत हे देखील पाहा.

वाचा: फक्त १९९९ रुपयांत घरी न्या १०८ MP कॅमेरासह पॅक्ड हा फोन, Flipkart वर ऑफर

तुमच्या घरातील वाय-फायशी कोणती डिव्‍हाइस कनेक्‍ट आहेत हे पाहण्‍यासाठी, तुम्‍हाला सर्वप्रथम राउटरचे अॅप लोड करण्‍याची आवश्‍यकता आहे. तुमचा वाय-फाय सेट करताना तुम्ही हे अॅप आधी वापरलं असेल.

तसेच तुमच्या राउटरच्या तळाशी तुम्हाला तो पत्ता मिळेल जो तुम्हाला डिव्हाइसशी कनेक्ट करण्याची परवानगी देईल. तुमच्या राउटरमध्ये सहचर अॅप नसल्यास, तुम्ही ते ब्राउझरमध्ये देखील लोड करू शकता. त्यात लॉग इन करा आणि कनेक्टेड डिव्हाइसेस, वायरलेस क्लायंट किंवा मेनूमधील अशा कोणत्याही पर्यायावर जा. यामध्ये तुम्हाला कळेल की तुमच्या वाय-फायशी किती आणि कोणती उपकरणे कनेक्ट आहेत.

जर तुमच्या वाय-फायशी अनेक गॅजेट्स कनेक्ट केलेले असतील तर, तुम्हाला काही गॅजेट्सची माहिती नसेल. कारण, सर्व कनेक्टेड गॅझेटचे नाव iphone, ipad सारखे साधे असेच असे नाही. हे शोधण्याचा एक मार्ग म्हणजे तुमच्या घरातील सर्व डिव्हाइसचे वाय-फाय बंद करणे. राउटर टॅब किंवा अॅप रिफ्रेश करा. यानंतर तुम्हाला तुमचा संगणक फक्त वाय-फायशी कनेक्ट केलेला दिसेल. याशिवाय, तुम्ही जे उपकरण पहाल ते तुमचे इंटरनेट वापरत असलेल्या दुसऱ्याचे असेल.

एखाद्याला तुमचे वाय-फाय वापरण्यापासून कसे ब्लॉक करावे?

सर्वात सोपा मार्ग म्हणजे वायरलेस सेटिंग्ज किंवा वायरलेस सिक्युरिटीमध्ये जाऊन पासवर्ड बदलणे. प्रथम ते तुम्हाला तुमचा जुना पासवर्ड विचारेल, नंतर नवीन पासवर्ड टाका. सेव्ह करा आणि बदल करा. यानंतर, नवीन वाय-फाय पासवर्ड वापरून सर्व डिव्हाइस कनेक्ट करा.

वाचा: फोनमध्ये अचानक हे बदल दिसताहेत ? व्हा अलर्ट, असू शकतो Hacking चा प्रकार

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *