Headlines

‘मी त्यांच्यासारखी नाही आणि…’, Ex-Husband अरबाज खानच्या ब्रेकअपवर Malaika Arora चं मोठ वक्तव्य

[ad_1]

Malaika Arora on Ex-Husband Arbaaz Khan and Giorgia Andriani Breakup : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका तिच्या फिटनेससाठी आणि फॅशनसाठी ओळखली दाते. मलायका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या मलायका अलीकडेच प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या शोमधील गोष्टींमुळे चर्चेत आहे. खरं तर शोमध्ये करण जोहरनं मलायकाला तिचा पुर्वाश्रमीचा पती अरबाज खान (Arbaaz Khan) आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीबद्दल (Giorgia Andriani) काही प्रश्न विचारले. ज्यावर मलायकानं स्पष्टपणे वक्तव्य केले. 

पाहा काय म्हणाली मलायका 

करणनं शोमध्ये मलायकाला विचारलं, जेव्हा नुकताच अरबाज आणि जॉर्जियाचा ब्रेकअप झाला तेव्हा तू याविषयी त्याच्याशी चर्चा केलीस का? त्यावर उत्तर देत मलायका म्हणाली, मला अरबाज आणि जॉर्जिच्या ब्रेकअपच्या अफवांची खात्री नाही.’ (Arbaaz Khan and Giorgia Andriani Breakup)

मलायका पुढे म्हणाली, ‘खर सांगू तर, मी त्याला असे प्रश्न विचारत नाही. मला कोणाला त्यांच्या आयुष्याविषयी विचारायला आवडत नाही. मी अरहानला देखील विचारत नाही की त्याच्या आयुष्यात काय सुरु आहे? मला असं वाटतं की मी लाइन क्रॉस करत आहे. मला याची कल्पना आहे की असे बरेच कपल आहेत ज्यांना घटस्फोटानंतरही त्यांच्या मुलांकडून एकमेकांच्या आयुष्याबद्दल अपडेट मिळतात, पण मी त्यांच्यासारखी नाही. मी या सर्व गोष्टींपासून दूर राहते.’ 

हेही वाचा : चार वर्षांचं नातं तुटल्यानंतर Shraddha Kapoor ची खरी ताकद समोर… Video Viral

मलायकाशी पुढे बोलताना करणनं विचारले की, विभक्त झाल्यानंतर तिचे अरबाजसोबत कोणते नाते आहे? याला उत्तर देत मलायका म्हणाली, ‘मला वाटतं की आमचं खूप चांगल जमत. आम्ही दोघे एकमेकांसोबत पूर्वीपेक्षा खूप चांगले राहतो.’ 

मलायका 1998 मध्ये अभिनेता अरबाज खानसोबत लग्न बंधनात अडकली होती, त्या दोघांचा एक मुलगा असून अरहान असे त्याचे नाव आहे. लग्नाच्या 19 वर्षानंतर 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतरही मलायका आणि अरबाज अनेकदा त्यांच्या मुलासोबत स्पॉट झाले आहेत. मलायकानं घटस्फोटाच्या वेळी अरबाजकडून 15 कोटी रुपये पोटगी घेतली होती. दरम्यान, त्यानंतर मलायका अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) डेट करू लागली तर अरबाज मॉडेल जॉर्जिया एंड्रियाला डेट करत आहे. दुसरकीडे अरबाज आणि जॉर्जियाच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, दोघांपैकी कोणीही या बातमीला दुजोरा दिलेला नाही.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *