Headlines

‘हुमायू’ पाठोपाठ ‘सलीम’ही गुजरातमध्ये! ; फ्लेमिंगोंच्या प्रवासातील रहस्य लवकरच स्पष्ट

[ad_1]

नागपूर : उपग्रह ‘टॅगिंग’ केलेल्या ‘हुमायू’ने जून महिन्याच्या अखेरीस अवघ्या ३१ तास ५४ मिनिटांत महाराष्ट्र ते गुजरात प्रवास केला होता. त्याच्याच पावलावर पाऊल टाकत ‘सलीम’देखील महाराष्ट्रातून गुजरातमध्ये पोहोचला आहे. ‘बीएनएचएस’ने (बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी) उपग्रह टॅगिंग केलेल्या सहा फ्लेमिंगोपैकी या दोन फ्लेमिंगोंनी गुजरातकडे भरारी घेतली आहे.

‘बीएनएचएस’ने मुंबई येथे भारतीय उपखंडातील फ्लेमिंगोचे प्रजनन आणि प्रजनन नसलेल्या ठिकाणी त्याच्या स्थलांतरणाचे रहस्य उलगडण्यासाठी ‘रिगिग आणि उपग्रह टेलिमेट्री’ हा प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पांतर्गत जानेवारी ते एप्रिल २०२२ या कालावधीत फ्लेमिंगोंना सौर ऊर्जेवर चालणारे ‘जीपीएस-जीएसएम रेडिओ टॅग’ लावण्यात आले. या टॅगिंग केलेल्या सहाही फ्लेमिंगोंना संशोधकांची नावे देण्यात आली. यातील ‘हुमायू’या फ्लेमिंगोने जून महिन्यात ३१ तास ५४ मिनिटांचा रोमहर्षक प्रवास करत गुजरातमधील भावनगर गाठले होते. त्याच्यापाठोपाठ आता ‘सलीम’ हे नाव देण्यात आलेल्या फ्लेमिंगोनेदेखील गुजरामधील भावनगर गाठले. डॉ. सलीम अली यांच्या नावावरून त्याला हे नाव देण्यात आले. ६ जुलैला सायंकाळी ‘सलीम’ने मुंबईतील वाशीचा परिसर सोडला आणि ७ जुलैला सकाळी तो गुजरामधील भावनगरजवळ पोहोचला. ‘सलीम’ आणि ‘हुमायू’ भावनगरजवळ एकाच परिसरात आहेत.

‘सलीम’ वाशीवरून निघाला तेव्हा पाऊस, वारा होता. प्राथमिक अंदाजानुसार तो ‘हुमायू’प्रमाणे वळणे न घेता सरळ गेला असावा, असा अंदाज आहे. ‘सलीम’चा महाराष्ट्र ते गुजरात या प्रवासातील अंतर्गत बाबी अजून उलगडायच्या आहेत. ‘सलीम’ आणि ‘हुमायू’ सध्या एकाच परिसरात आहेत.

– डॉ. राहुल खोत, उपसंचालक, बीएनएचएस

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *