Headlines

हिजाब प्रकरणी Miss Universe हरनाझ संधूचं मोठं वक्तव्य, पुन्हा पुन्हा ऐकाल हा Video

[ad_1]

मुंबई : कर्नाटक हिजाब वाद (Hijab Row) प्रकरणी मिस युनिव्हर्स 2021 हरनाझ संधू हिनं तिची प्रतिक्रिया दिली आहे. सदर प्रकरणावरून मुलींना निशाण्यावर घेता कामा नये, असं तिनं स्पष्ट केलं. (Harnaaz Sandhu)

मुलींना उगा निशाण्यावर न घेता त्यांना स्वच्छंदी जगू द्या, अशी इच्छा तिनं व्यक्त केली. 

कर्नाटक उच्च न्यायालयातील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठानं हिजाब प्रकरणी दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली होती. या याचिकेमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींसाठी हिजाब वापराची परवानगी मागण्यात आली होती. 

व्हायरल होतोय व्हिडीओ… 

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे. जिथं पत्रकारानं संधूला हिजाब मुद्द्यावर प्रश्न विचारला ज्यावर तिचं उत्तर सर्वांच्या नजरा वळवून गेलं. 

‘त्यांना (मुलींना) जसं हवंय तसं जगू द्या. उगाचच त्यांना निशाण्यावर घेऊ नका’, असं ती म्हणाली. हा व्हिडीओ 17 मार्चचा असल्याचं सांगण्यात येत आहे. 

काय म्हणाली ही सुंदरी? 

‘प्रामाणिकपणे सांगा… कायम मुलींवरच का निशाणा साधता तुम्ही? आताही तुम्ही मला निशाण्यावर घेत आहात. जसंकी हिजाब मुद्द्यावरून मुलींना निशाण्यावर घेतलं जात आहे. 

त्यांना हवं तसं जगूद्या. ध्येय्यापर्यंत पोहोचू द्या, त्यांना आसमंतात उडू द्या.. मुलींच्या महत्त्वाकांक्षांचे पंख छाटण्याचं काम तुम्ही करु नका’, असं ती म्हणाली. 

मुख्य म्हणजे हा प्रश्न विचारताच आयोजकांकडून त्यावेळी हरनाझला असे प्रश्न करु नयेत असा सूर आळवत आयोजकांनी नाराजीचा सूर आळवला होता. 

हरनाझनं या मुद्द्यावरही व्यक्त व्हावं अशी पत्रकारांची इच्छा होती. ज्यानंतर ती समाजात मुलींवर कशा प्रकारे निशाणा साधला जात आहे, हे पाहता त्यावर आपलं स्पष्ट मत मांडलं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *