Headlines

हा कसला Attitude! मराठी अभिनेत्री तिच्या मागे धावत गेली, पण… Kareena Kapoor च्या कृत्यावर महेश टिळेकर संतापले

[ad_1]

Mahesh Tilekar on Kareena Kapoor Khan : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. करीनाविषयी मराठमोळा दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी हा मोठा खुलासा केला आहे. महेश टिळेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एका मराठी अभिनेत्रीनं कशा प्रकारे करीनाला पाहताच लाळघोटेपणा केला ते सांगितले आहे. इतकंच काय तर करीनानं कशाप्रकारे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं हे देखील सांगितलं. महेश यांना ही आठवण इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांचा एक व्हिडीओ पाहताना आली. त्यांचा एक फोटो शेअर करत महेश टिळेकर यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. 

महेश टिळेकर यांनी ही पोस्ट त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये महेश टिळेकर यांनी नारायण मूर्ती यांचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ते म्हणाले, कुठं मूर्ती आणि कुठे करीना? नुकताच इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांच्या इंटरव्ह्यूचा एक व्हिडिओ पाहिला ज्यात ते सांगत होते की लंडनहून ते भारतात येत असताना फ्लाईटमध्ये त्यांच्या पुढच्या सीटवर करीना कपूर बसली होती. फ्लाईट मधील काही लोक नारायण मूर्ती यांच्याजवळ येऊन त्यांना अभिवादन करत होते ,दोन शब्द बोलत होते आणि लोक आपल्याला रिस्पेक्ट देतायेत म्हणून मूर्ती उभे राहून त्यांच्याशी संवाद साधत होते, पण काही चाहते करीना कपूर जवळ जाऊन तिला हॅलो म्हणत होते तर ही त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हती आणि ही गोष्ट नारायण मूर्ती यांना खूप खटकल्याचे त्यांनी सांगितले आणि करीनाचा असा इगो काय कामाचा? असा प्रश्नही त्यांनी केला, असे महेश टिळेकर म्हणाले.

पुढे महेश टिळेकर त्यांना आलेला एक अनुभव सांगत म्हणाले, ‘8 वर्षांपूर्वी आमचा मराठी तारका कार्यक्रमाचा परदेशातून शो करून एअरपोर्टवर आल्यावर पुन्हा तिथे चेकिंगसाठी असणाऱ्या रांगेत मी उभा होतो, तर आमच्या कार्यक्रमातील एका मराठी अभिनेत्रीच्या पुढे करीना कपूर उभी होती, तिचा पासपोर्ट दाखवून ती पुढे वळताना तिचा चेहरा दिसला तसा आपली मराठी अभिनेत्री तिच्याशी बोलायला म्हणून लाळ घोटेपणा करत तिच्या मागे धावत गेली, पण करीना तिला फाट्यावर मारत झपाझप पावले टाकत पुढे निघून गेली. बरं याच मराठी अभिनेत्रीने करीना कपूरच्या एका लोकप्रिय चित्रपटात एका सिनसाठी नगण्य भूमिका केली होती तरी देखील करीनानं तिच्याकडे मान वळवून ही पाहिलं नाही, फोटो काढणं तर दूरच.

हेही वाचा : ‘त्याच्याच जीवावर पोट भरलं अन्…’, हास्यजत्रेतील ‘या’ कलाकारासाठी केदार शिंदेंची खास पोस्ट

पुढे महेश टिळेकर हे सेलिब्रिटी त्यांना गरज असते तेव्हा कशा प्रकारे सगळ्यांशी वागतात, याविषयी सांगताना म्हणाले, ‘पण हेच स्वतः च्या प्रेमात असणारे काही सेलिब्रिटी यांचा एखादा चित्रपट रिलीज व्हायचा असेल तेव्हा जनमानसात मिसळून, चाहत्यांबद्दल प्रेम असल्याचा जो अभिनय करतात त्याला खरंच तोड नाही. मागे एका इन्टरव्ह्यूमध्ये हिंदीत काम करणारी मराठी अभिनेत्री राधिका आपटे हिने सांगितले की तिला लोकांना फोटो, सेल्फी द्यायला आवडत नाही, ती ऑटोग्राफ पण देत नाही याविषयी चाहत्यांना सांगत होती. पण काहीच दिवसांपूर्वी OTT वर रिलीज झालेल्या तिच्या एका हिंदी सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने मात्र सोशल मीडियावर पॉप्युलर असणाऱ्या काही इन्फ्लुंसर बरोबर सेल्फी देऊन स्वतः ची प्रसिध्दी करून घेत होती. बरं या बयेला ती कुठं राहते तो पत्ता पण लोकांना, तिच्या चाहत्यांना कळू नये असं वाटतं. जर समजलं लोकांना ही कुठं राहते मुंबईत तर काय फरक पडणार आहे? अमिताभ बच्चन, सलमान, शाहरुख यांना पहायला जशी गर्दी जमते तसा जनसमुदाय हीची एक झलक दिसावी म्हणून हिच्या बिल्डिंग बाहेर जमा होणार आहे का??? जेव्हा कामं मिळणं बंद होतं, प्रसिद्धीचा काळ संपतो तेव्हा कुणीतरी आपली दखल घ्यावी म्हणून बेचैन होणारे अनेक नट- नट्या मी जवळून पाहिले आहे.’ 

महेश टिळेकर यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. तर त्यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत ते योग्य बोलत असल्याचे म्हटले आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *