Headlines

शारीरिक बदल होत नसल्यानं.., ‘बाई बुब्स आणि ब्रा’नंतर अभिनेत्री हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत!

[ad_1]

Marathi Actress Hemangi Kavi: आपल्या रोखठोक आणि मनमोकळ्या स्वभावासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी (Hemangi Kavi). विषय कोणताही असो, हेमांगीचं मतं मात्र स्पष्ट असतात. महिलांचे मुद्दे अगदी प्रखरतेने मांडणारी हेमांगी तिच्या आगळ्या वेगळ्या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय असते. दोन वर्षांपूर्वी हेमांगीची ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ (Bai boobs & Bra) ही पोस्ट तुफान प्रसिद्ध झाली होती. अशातच हेमांगीची आणखी एक पोस्ट (Hemangi Kavi New Post) सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये तिने कपड्यांच्या एक पोस्ट लिहिलीये. तसेच पुरूषांना सल्ला देखील दिलाय.

काय म्हणाली हेमांगी कवी?

Maturity is when u don’t feel like shopping for clothes anymore! (मॅच्युरिटी म्हणजे जेव्हा तुम्हाला आता कपड्यांची खरेदी करावीशी वाटत नाही) थोडं विचित्र आहे पण खरंय, असं हेमांगी कवी म्हणते.

मी २०२० आणि २०२१ पुर्ण २ वर्ष कपड्यांचं बिलकुल शॉपिंग केलं नाही. अक्षरशः एकतर लॉकडाऊन चालू होता, दुसरं म्हणजे त्याच काळात उमगलं की कपड्यांवर खुपच खर्च होतो आणि तिसरं म्हणजे माझ्यात फार मोठे शारीरिक बदल होत नसल्यामुळे कपड्यांचा ढीग साचतोय आणि कपाट कमी पडतंय. माझ्याकडे १५-२० वर्षांपासूनचे कपडे अजूनही चांगल्या परिस्थितीत मध्ये आहेत आणि मी ते वापरते. काही माझ्या भाच्यांना देते. काही मिक्स मॅच करत वापरते. आता इतकी वर्ष हे कपडे टिकतात कसे तर एक म्हणजे कपडे नीट वापरायची, जपून धुवायची शिस्त आणि दुसरं म्हणजे या कला क्षेत्रात काम केल्याच्या अनेक फायद्यांमध्ये शॉपिंग सेट, नाटकातले कपडे दिवसभर घातल्यामुळे आमच्या पर्सनल कपड्यांचा कमीत कमी वापर केला जातो, असंही हेमांगी म्हणते.

पण आता तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असलात (खासकरून महीलांसाठी) तरी सोशल मीडियामुळे एकदा का एका आऊटफिट वर तुम्ही एखादा फोटो पोस्ट केला की झालं परत तो वापरायचा नाही असा एक अलिखित नियम रूढ होतोय. मी या नियमातून स्वतःला मुक्त केलंय. मी कपडे रिपीट करते. त्यावरचे फोटोस ही पोस्ट करते. अगदी बिनधास्त. काही आगाऊ लोकं कमेंटमध्ये त्यांच्या बारीक निरीक्षणाची आणि बेरकी स्वभावाची पावती देतात पण मला फरक पडत नाही. आता मी ४-५ महीन्यातून एकदा शॉपिंग करते. खरंच खुप बरं वाटतं. हलकं वाटतं, असं रोखठोक मत तिने मांडलंय.

आणखी वाचा –  ”उर्फीची आंटी आली”, फ्रंट कट गाऊन घातल्यानं Malaika Arora ट्रोल

या पोस्टमधून देशा समोर उभे असलेले प्रॉब्लेमचे निराकरण होणार नाही किंवा या माझ्या आत्मज्ञानाने तुम्हांला काही एक फायदा होणार नाहीए हे मला माहितीये पण मला शेअर करावंसं वाटलं म्हणून केलं. आता मला ती मॅच्युरिटी गाठायची आहे जेव्हा हे असलं काही शेअर करणं ही निरर्थक वाटू लागेल, असंही हेमांगी म्हणते.

पाहा पोस्ट –

दरम्यान, मंडळातील पुरूष सदस्यांनी लगेच आपल्या नात्यातल्या, ओळखीतल्या, घरातल्या, बाहेरच्या, ऑनलाईनच्या, ऑफलाईनच्या स्रियांना शॉपिंग कसं करू नये, याचं उत्तम उदाहरण म्हणून ही पोस्ट वाचून दाखवू किंवा फॉर्वर्ड करू नये अन्यथा तुमचा रविवार खराब होण्याची शक्यता उद्भवेल, असं म्हणत हेमांगीने मोलाचा सल्ला दिलाय.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *