Headlines

“हा घातपात असेल तर…” विनायक मेटे यांच्या मृत्यूबाबत चंद्रकांत पाटलांच विधान! | BJP leader chandrakant patil on vinayak mete death car accident investigation rmm 97

[ad_1]

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मोटार अपघातात मृत्यू झाला आहे. ते बीडहून मुंबईला जात होते. मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित केलेल्या एका बैठकीला ते उपस्थित राहणार होते. पहाटे पाचच्या सुमारास भातण बोगदा ओलांडण्याआधी त्यांच्या वाहनाला अपघात झाला. मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर आता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. विनायक मेटे यांच्या डॉक्टर पत्नी ज्योती मेटे यांनीदेखील काहीतरी वाईट घडल्याचा संशय व्यक्त केला आहे.

या सर्व घटनाक्रमानंतर भाजपा नेते आणि महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विनायक मेटे यांच्यासोबत घातपात झाला असेल तर त्याच्या मुळापर्यंत मुख्यमंत्री जातील. घटनेची सविस्तर चौकशी होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- “साहेबांचा चेहरा अतोनात पांढरा पडला होता” विनायक मेटेंच्या डॉक्टर पत्नीकडून मृत्यूबाबत संशय व्यक्त; म्हणाल्या…

विनायक मेटे यांचा घातपात झाला असल्याच्या संशयाबाबत विचारलं असता, चंद्रकांत पाटील म्हणाले की, “विनायक मेटे यांच्या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ रुग्णालयात जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. त्यावेळी त्यांनी म्हटलं की, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल. आताच मला असंही कळालं आहे की, तो ट्रक गुजराजमधील सुरत याठिकाणी सापडला आहे. आता ट्रक सापडला आहे, त्यामुळे तो चालकही सापडेल. मग या घटनेची चौकशीही होईल. याक्षणी संबंधित घटनेबाबत मी मत व्यक्त करणं बरोबर नाही. पण हा जर घातपात असेल तर मुख्यमंत्री त्याच्या मुळापर्यंत जातील” अशी ग्वाही चंद्रकांत पाटलांनी दिली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *