Headlines

गर्लफ्रेंड नजिलासोबत ब्रेकअपच्या चर्चांवर Munawar Faruqui स्पष्टचं बोलला

[ad_1]

मुंबई : लॉक अप विजेता मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) अनेक कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतो. कधी शो रद्द झाल्यामुळे तर कधी गर्लफ्रेंडमुळे तो चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो त्याच्या गर्लफ्रेंड नजिलामुळेच चर्चेत आला आहे. मुनव्वरने गर्लफ्रेंड नजिलासोबत (Nazila) ब्रेकअप केल्याची चर्चा आहे. या चर्चेवर त्याने प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया देताना त्याने ब्रेकअपच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
 
मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) आणि नजिला (Nazila) यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या बातम्या कालपासून मीडियामध्ये प्रसिद्ध होत आहे. या बातम्यांमुळे सोशल मीडियावर दोघांच्या ब्रेकअपची चर्चा सुरु आहे. या चर्चांवर प्रथमच मुनव्वर फारुकीने इन्स्टा पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. मुनव्वरने नजिलासोबतच्या ब्रेकअपच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. 

समंदर मे नहाके और भीssss; निळ्याशार समुद्रात खुलून आलं Mouni Roy चं सौंदर्य

इन्स्टा स्टोरीत काय?

ब्रेकअपच्या चर्चांनंतर मुन्नवरने (Munawar Faruqui) इंस्टाग्राम स्टोरी ठेवली होती. या स्टोरीमध्ये तो ब्रेकअपचा हवाला देत म्हणतो,“ये क्या फुक के कर रहे है ये लोग? क्या फूक रहे है ये लोग क्या मालूम ? असा प्रश्न तो विचारताना दिसत आहे. या प्रश्नानंतर तो कॅमेरा नजिलाकडे वळवतो,यावेळी ती त्याच्या शेजारी बसलेली दिसते.यावेळी ती बर्फाच्या गोळ्याचा आनंद घेताना दिसली. एकंदरीत मुन्नवरने या स्टोरीमध्ये नझिलासोबत असल्याचा दाखला दिला आहे, त्यासोबतच ब्रेकअपवर स्वत:च प्रश्न उपस्थित करत या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. 

ब्रेकअपची अशी चर्चा सुरु झाली?
बॉम्बे टाइम्सच्या सूत्राने असा दावा केला होता की, हे जोडपे वेगळे झाले आहेत.त्यांनी त्यांचे नाते संपवले आहे. दोघांनीही इन्स्टाग्राम आणि इतर सोशल नेटवर्किंग साइट्सवर एकमेकांना फॉलो करणे बंद केले आहे. इतकेच नाही, तर मुन्नवरच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. त्यामुळे माध्यमांमध्ये मुन्नवर (Munawar Faruqui) आणि नजिलाच्या ब्रेकअपच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या.  

मुलाखतीत काय म्हणाला?
ETimes शी बोलताना मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) म्हणाला होता, “मी नाझिलाला एका वर्षापासून ओळखतो आणि आम्ही काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहोत. तसेच लॉकअप शोमध्ये त्याने त्याच्या रिलेशनशिपबद्दल काही एक माहिती दिली नव्हती, यावर तो म्हणाला की, घरातील परिस्थिती नाझीलबद्दल बोलायला योग्य नव्हती. मी शोच्या आत असल्याने आणि ती बाहेर होती आणि त्याक्षणी मी तिच्यासोबत बाहेरच्या जगात नव्हतो म्हणून मी तिची ओळख उघड करणे टाळले होते, असे स्पष्टीकरण त्याने यावेळी दिले होते. 

दरम्यान मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) आणि नजिला यांनी डिसेंबर 2021 मध्ये डेटींगला सुरुवात केली होती. आजही ते एकत्र आहेत. सोशल मीडियावर त्यांचा ब्रेकअप झाल्याची बातमी फेक होती. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *