Headlines

ठरलं! फरहान अख्तरची मोठी अपडेट; ‘डॉन 3’ मध्ये शाहरुखला रिप्लेस करणार रणवीर सिंग

[ad_1]

Ranveer Singh in Don 3: फरान अख्तर आणि ‘डॉन’ या चित्रपटाचे कनेक्शन हे फारच जवळचे आहे. अर्थातच ‘डॉन’ या चित्रपटाचे लेखक सलीम खान आणि जावेद अख्तर म्हणजेच सलीम जावेद यांनी या चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवरून नेऊन ठेवले होते. त्यातून Don 2 आणि Don या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शनही फरान अख्तर यानं केलं होते. त्यात शाहरूख खान आपल्याला डॉनच्या भुमिकेतून दिसला होता. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा तेव्हाही होती आणि आजही आहे. हा चित्रपट बॉलिवूड चित्रपटाची शान आहे. बीग बी अमिताभ बच्चन यांनी ‘डॉन’ या चित्रपटाला आपल्या अभिनयानं एक वेगळाच लुक दिला होता. हा चित्रपट, या चित्रपटाचे लेखन, संवाद, गाणी, कथा आणि डिरेक्शन या सर्व गोष्टींमुळे चित्रपटानं प्रेक्षकांवर मोहोनी घातली होती. त्यामुळे हा चित्रपट हीट होणारच होता.

2006 आणि नंतर 2011 साली आलेल्या ‘डॉन’ च्या दोन्ही भागांनी तरूणाईमध्ये या चित्रपटाची क्रेझ निर्माण केलेली होती. 1978 साली आलेल्या ‘डॉन’ मध्ये आपण अमिताभ बच्चन यांना पाहिले तर 2006 आणि 2012 साली आलेल्या ‘डॉन’ मध्ये आपण शाहरूख खानला पाहिले होते. आता 2025 च्या ‘डॉन’ मध्ये आपल्या रणवीर सिंग दिसणार असल्याची चर्चा होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे. फरान अख्तरनं आज एक पत्र जाहीर केलं आहे. ज्यात त्यानं याबाबत नमुद केले आहे की यापुढे येणाऱ्या ‘डॉन’ च्या तिसऱ्या भागात शाहरूख खान दिसणार दिसून आजच्याच घडीचा लोकप्रिय आणि डॅंशिग अभिनेता असेल. तत्पुर्वी बीटाऊनमध्ये ही चर्चा होतीच की, येत्या ‘डॉन’ च्या तिसऱ्या भागात आपल्याला शाहरूख खान पाहायला मिळणार नसून रणवीर सिंग पाहायला मिळणार आहे. तेव्हा फरान अख्तरच्या या पोस्टवरून नव्या अभिनेत्याची एन्ट्री निश्चित आहे. 

हेही वाचा – Gadar 2 आणि OMG 2 चं नाही तर बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी ‘हे’ चित्रपटही झालेले प्रदर्शित

आणि या पत्रानुसार रणवीर सिंगचं तो अभिनेता असण्याची दाट शक्यता आहे. यावेळी या पत्रात अद्याप तरी फरान अख्तरनं रणवीर सिंगचे नाव हे घेतेलेले नाही. फराननं ट्विटरवरून आपल्या एक्सेल एन्टरटेनमेंटच्या वतीनं पत्रक प्रसिद्ध केले आहे. यावेळी तो यात म्हणतो की, ”1978 साली सलीम-जावेद यांनी अमिताभ बच्चन यांच्यासाठी खास पात्र लिहिलं होतं जे त्यांनी अजरामर केले होते. या पात्राचे नाव होते ‘डॉन’. त्यातूनच 2006 साली शाहरूख खान यानं ही भुमिका अजरामर केली होती. लेखक-दिग्दर्शक असल्यानं मला Don आणि Don 2 या दोन्ही चित्रपटामध्ये शाहरूख खानसोबत काम करताना खूप मजा आली आहे.

परंतु यावेळी आता हीच लेगेसी पुढे घेऊन जात आता हेच पात्र एक नवा आणि हरहुन्नरी अभिनेता साकारणार आहे. अमिताभ बच्चन आणि शाहरूख खानप्रमाणेच तुम्ही याच्यावरही प्रेम कराल याची मला खात्री आहे. तेव्हा 2025 ची वाट आहे. आता नवे पर्व सुरू होते आहे”, असं त्यानं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *