Headlines

Falgun Vinayaka Chaturthi 2023 : फाल्गुन विनायक चतुर्थीला दुर्मिळ 4 अद्भूत योग, ‘हे’ उपाय तुम्हाला करतील धनवान

[ad_1]

Falgun Vinayaka Chaturthi 2023 : तुमचा आमचा लाडका बाप्पा…विघ्नहर्ताला प्रसन्न करण्यासाठी हिंदू धर्मात मंगळवार, बुधवार हा वार समर्पित करण्यात आला आहे. त्याशिवाय महिन्यातून दोन वेळा चतुर्थीचं व्रत करु गणरायाला प्रसन्न केलं जातं. महिन्यात एक कृष्ण आणि एक शुक्ल पक्षाला गणेशाची आराधना केली जाते. या महिन्यातील आणि फाल्गुल महिन्यातील शुक्ल पक्षातील फाल्गुन विनायक चतुर्थी गुरुवारी 23 फेब्रुवारी 2023 ला आहे. या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करणाऱ्यांची सर्व कामं सिद्ध होतात, अशी मान्यता आहे. याशिवाय धनसंपत्तासाठी यावेळीची विनायक चतुर्थी अगदी खास आहे. कारण यावेळी  दुर्मिळ 4 अद्भूत योग आले आहेत. (Falgun Vinayaka Chaturthi 2023 date Thursday 23 February 2023 puja muhurat Money Upay Shubh yoga on ganesh in marathi) 

विनायक चतुर्थी 2023 शुभ योग (Falgun Vinayak Chaturthi 2023 Shubh yoga)

फाल्गुन विनायक चतुर्थी व्रताच्या दिवशी 4 शुभ योग सर्वार्थ सिद्धी, रवि योग, शुक्ल आणि शुभ योग यांचा दुर्मिळ संयोग तयार होत आहे. पौराणिक मान्यतेनुसार शुभ हा गणपतीचा पुत्र मानला जातो. दुसरीकडे, ज्योतिषशास्त्र सांगते की शुभ योगामध्ये काही महान कार्य केल्याने व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व सुधारते आणि त्याला प्रसिद्धी मिळते. अशा परिस्थितीत गणपतीची पूजा करून नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ राहील.

सर्वार्थ सिद्धी योग – दिवसभर

शुभ योग – 22 फेब्रुवारी 2023, रात्री 11.47 – 23 फेब्रुवारी 2023, रात्री 08.58
शुक्ल योग – 23 फेब्रुवारी 2023, 08.58 pm – 24 फेब्रुवारी 2023, 06.48 pm
रवि योग – 23 फेब्रुवारी 2023, संध्याकाळी 06.57 – 24 फेब्रुवारी 2023, 03.44 am

 

हेसुद्धा वाचा – Vinayak Chaturthi Vrat 2023 : फाल्गुन महिन्याची विनायक चतुर्थी कधी आहे? भगवान श्रीकृष्णाने ‘या’ दिवशी केलेली चूक तुम्ही करू नका

 

फाल्गुन विनायक चतुर्थीला करा हे उपाय (Falgun Vinayak Chaturthi Upay)

विनायक चतुर्थीवर गणपतीचा विशेष प्रभाव असतो. अशा स्थितीत शुभ मुहूर्तावर गणपतीची पूजा करा आणि संध्याकाळी संकटनाशन गणेश स्तोत्राचं पठण करा. असं म्हणतात की यामुळे कामात येणारे अडथळे नष्ट होतात आणि गणपतीच्या कृपेने सर्व कामं सफळ होतात. आपल्याला धनसंपत्ती लाभते. 

गणरायाला 21 लाडू अर्पण करा आणि नंतर ते गरीब मुलांना दान करा. शक्य असल्यास घरातील मुलांकडून दान करून घ्या. यामुळे त्याचा बुध मजबूत होईल आणि अभ्यासात रस वाढेल.

फाल्गुन विनायक चतुर्थीला गणेशाला सिंदूर तिलक लावावा. टिळक लावताना ”सिन्दूरं शोभनं रक्तं सौभाग्यं सुखवर्धनम्। शुभदं कामदं चैव सिन्दूरं प्रतिगृह्यताम्॥” या मंत्रांचं पठण करा. घरामध्ये कोणी आजार असल्यास गणपतीला सिंदूर अर्पण करून रुग्णाला लावावा. त्यामुळे घातक आजारही दूर होतात.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *