Headlines

विश्वासच बसणार नाही, पाहा कसं शाही आयुष्य जगतोय हा ‘कुली’

[ad_1]

मुंबई : कुली… रेल्वे स्थानकांवर एखाद्या लांब पल्ल्याच्या रेल्वेतून तुम्ही उतरलात आणि  तुमच्याकडे बरंच सामान असेल तर काही मंडळी सामान घेण्यासाठी तुमच्या मदतीला येतात. अमुक एक रक्कम त्यांच्या हाती दिली, की ही मंडळी पटापट तुमचं सामान खांद्यांवर, पाठीवर, डोक्यावर लादतात आणि तुम्हाला अपेक्षित स्थळी सोडतात. 

किती ओझं उचलतात हे… असं म्हणत तुम्हाला कधीतरी यांची दयारी येत असेल. याच Coolie चं आयुष्य चित्रपटांतूनही दाखवण्यात आलं आहे. अगदी ते अमिताभ बच्चन असो, गोविंदा असो किंवा मग वरुण धवन. 

हिंदी चित्रपटांमध्येही ज्या कुलीला मानाचं स्थान मिळालं, त्यांच्यातलाच एक कुली आज कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे. लाखोंच्या किमतीच्या कार त्याच्या दाराशी उभ्या आहेत. 

बरं, तो तितकाच लोकप्रियही आहे बरं…. काही अंदाज लावता येतोय का? हा श्रीमंत कुली आहे तरी कोण? 

तर, हा कुली दुसरातिसरा कुणी नसून, अभिनेता वरूण धवन. रुपेरी पडद्यावर ‘कुली नंबर 1’ या चित्रपटामध्ये त्यानं ही भूमिका साकारली होती. बॉलिवूडचा हा स्टायलिस्ट कुली म्हणजेच वरुण संपत्ती बाबतीत सर्वांनाच थक्क करत आहे. (Varun Dhawan net worth)

89 लाख रुपये इतकी किंमत असणारी एसयूवी ऑडी क्यू7 ही कार त्याच्या दाराशी आहे. शिवाय 88 लाख रुपये इतकी किंमत असणाऱ्या मर्सिडीज-बेंज GLS 350d 4Matic या कारचाही तो मालक आहे. 

59 लाख रुपयांची लँड रोव्हर LR3 ही कारही त्याच्याकडे आहे. 2.40 लाख रुपये किंमत असणारी रॉयल एनफिल्ड बाईक त्याच्याकडे आहे. क्वाड बाइक पोलारिस स्पोर्ट्समॅन 850 सुद्धा त्याच्यापाशी आहे. 

Coolie No 1' Varun Dhawan and 'Cool' Sara Ali Khan strike a pose together  on the sets

वरुण चित्रपटांसाठी घेत असणारं मानधन पाहता, त्याच्या एकूण संपत्तीचा आकडा 381 कोटी रुपयांच्या घरात असल्याचं म्हटलं जात आहे.  ‘कुली नंबर 1’ या चित्रपटासाठी त्यानं 25 कोटी रुपये इतकं मानधन घेतलं होतं. 

येत्या काळात तो (Varun Dhawan)  ‘जुग जुग जीयो’ या चित्रपटातून झळकणार आहे.  नीतू कपूर, अनिल कपूर, कियारा आडवाणी आणि प्राजक्ता कोळी या कलाकारांसोबत तो स्क्रीन शेअर करत आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *