Headlines

फडणवीसांनी ‘लाऊडस्पीकर’ असा उल्लेख केल्यानंतर संजय राऊतांनी दिलं उत्तर, म्हणाले “काय पिपाण्या, सनई चौघडे…” | Shivsena Sanjay Raut on BJP Devendra Fadanvis Loudspeaker Eknath Shinde Aditya Thackeray sgy 87

[ad_1]

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाऊडस्पीकर’ असा उल्लेख करत केलेल्या अप्रत्यक्ष टीकेला शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. आमचा लाऊडस्पीकर हा महाराष्ट्राच्या जनतेचा बुलंद आवाज आहे आणि तो तसाच घुमत राहील असं संजय राऊत मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. भाड्याचे भोंगे आणि लाऊडस्पीकर यात फरक आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

संजय राऊतांचा अप्रत्यक्ष उल्लेख होताच कार्यकर्त्यांकडून शेरेबाजी, फडणवीस म्हणाले, “त्यांना शिव्या देऊ नका…”

“आदित्य ठाकरेंचा दौऱा ठाण्यातून सुरु झाला आहे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला, सभांना, रोड शोला जो प्रतिसाद मिळत आहे, त्यासाठी उदंड हा शब्द कमी पडेल. ज्यांनी महाराष्ट्रात चोऱ्यामाऱ्या करुन सरकार स्थापन केलं त्यांच्यासाठी हे छातीत धडकी भडवणारं आहे. अनेक निष्ठावान शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रू आले. अश्रूंच्या महापुरात हे सरकार वाहून गेल्याशिवाय राहणार नाही, ही भावना महाराष्ट्रात सर्वत्र दिसत आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्रीपद!; चंद्रकांत पाटील यांचे विधान

“आम्ही भाजपाप्रमाणे सरकार कोसळेल असं लाऊडस्पीकरवरुन सांगणार नाही. त्यांच्या पिपाण्या वाजत होत्या. पण हे सरकार टिकणार नाही, बहुमत गमावेल, अंतर्गत कलाहाने पडेल. कोणाला काय बोलायचं आहे, पिपाण्या वाजवायच्या आहेत, सनई चौघडे वाजवायचे आहेत ते वाजवू द्या. आमचा लाऊडस्पीकर हा महाराष्ट्राच्या जनतेचा बुलंद आवाज आहे आणि तो तसाच घुमत राहील,” असं प्रतिपादन संजय राऊत यांनी केलं आहे.

भाजप सत्तापिपासू नसल्याने शिंदेंना मुख्यमंत्रीपद; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

“शिवसेनेचा लाऊडस्पीकर ५६ वर्ष सुरु आहे. यावरील संदेश आणि गर्जना ऐकण्यासाठी महाराष्ट्र आणि देश एका निष्ठेने शिवेसनेच्या मागे उभा आहे. आधी सरकार स्थापन करा. एक महिन्यानंतरही तुम्ही ‘एक दुजे के लिये’ स्क्रिप्टमध्ये अडकून पडला आहात. किती वेळा दिल्ली जाणार आहात?,” अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे.

“त्यांना रोज उठून माझा लाऊडस्पीकर ऐकावा लागतो. ५६ वर्षांपासून सुरु असलेला शिवसेनेचा हा लाऊडस्पीकर उतरवण्याची हिंमत कोणी करु शकलेलं नाही. तुमच्या पिपाण्या लोकांनी बंद केले आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.

चंद्रकांत पाटील यांनी मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं गेल्याचं वक्तव्य केल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की “भाजपामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्या नाही. तिथे मनमोकळेपणाने मत व्यक्त करता येत नाही. तरीही मी चंद्रकांत पाटील यांचं अभिनंदन करतो, त्यांनी थोडा काळ कोल्हापुरचं पाणी दाखवलं. जे त्यांच्या पोटात मळमळत होतं, ते पोटावर आलं. भाजपाच्या कार्यकर्त्यांची भावना आहे, असा खुलासाही त्यांना करावा लागला. त्या भावनेचा आदर व्हायला हवा होता”.

“आम्हाला जे बोलायचे ते आम्ही निर्भीडपणे बोलतो, परिणामाची पर्वा करत नाही. बाळासाहेबांची शिवसेना मराठी माणसाची भूमिका मांडच राहणार. फक्त सकाळी नाही तर २४ तास आम्ही बोलत राहू. आदित्य ठाकरेही दौऱ्यावर असून महाराष्ट्राला हवाहवासा वाटणारा लाऊडस्पीकर आहे. उद्धव ठाकरेही लवकर बाहेर पडणार असून बुलंद लाऊडस्पीकर दिसेल. प्रत्येक शिवसैनिकाचा आक्रोश, घराघरातील महिलेचा हुंदकाही लाऊडस्पीकर आहे. फडणवीसाजी हा लाऊस्पीकर तुम्हाला बधीर केल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा संजय राऊतांनी यावेळी दिला.

फडणवीस काय म्हणाले होते?

सकाळी ९ वाजता बोलणारे अलीकडे कमी बोलू लागले आहेत, कारण काही माहिती नाही असा अप्रत्यक्ष टोला फडणवीसांनी संजय राऊत यांना लगावला होता. “तुम्ही त्यांना कृपया शिव्या देऊ नका, उलट आभार माना. हे सरकार येण्यात त्यांचा जितका वाटा आहे, तितका इतर कोणाचाच नाही. महाराष्ट्राच्या जनतेला, शिवसेनेच्या नेत्यांना त्यांनी वैताग आणला. त्यामुळे हा लाऊडस्पीकर बंद करायचा असेल तर सत्तापरिवर्तनाशिवाय पर्याय नाही असा निर्णय त्यांनी घेतला,” असं फडणवीस म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *