Headlines

इमोशन्स, ड्रामा आणि सर्वकाही; ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ नक्की कशी आहे? पाहा ट्रेलर

[ad_1]

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Trailer: काळानुसार आता आपल्या नात्यांवरती वेगळा परिणाम होताना दिसत आहे. आत्ताचे रिलेशनशिप्सही बदलताना दिसत आहेत. तरूणाईपुढे वेगळी आव्हानंदेखील आहेत. परंतु कुठलंही लग्न जमवायचं असेल तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपल्या पालकांची परवानगी आणि त्यातून त्यांचा पांठिबा अन् त्यात जर दोन्ही परिवार हे वेगवेगळ्या संस्कृतीतले असतील तर? दोन प्रेमी युगुलांच्या प्रेमकहाणीवर त्याचसोबत नात्यांवर भाष्य करणारा आणि तरूणाई उत्सफुर्त करणारा आलिया आणि रणवीर सिंगचा Most Awaited चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाची प्रतिक्षा आता संपली आहे… या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद येताना दिसत आहे. 

गेल्या एका वर्षांपासून करण जोहरच्या या अफलातून चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. दोन वर्षांपासून या चित्रपटाची घोषणा झाली होती. त्यानंतर या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला होता. त्याच्या टीझरलाही प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळला होता. त्यानंतर अरिजीत सिंगच्या आवाजातील ‘तू क्या मिले’ हे गाणंही सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली असून आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे की कधी एकदा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. करण जोहरच्या करिअरला यावर्षी 25 वर्षे पुर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं हा पिक्चर करण जोहरसाठी खास आहे. त्यामुळे करण जोहरच्या फॅन्सना या चित्रपटाची विशेष उत्सुकता लागून राहिली आहे. 

हेही वाचा – रणबीर आलियाला म्हणतो, ”सॉरी म्हण त्याला…” VIDEO व्हायरल

परिवारात असणारे अनेक हवेदावे, प्रेम, भांडणं, विनोद, मजामस्ती, संघर्ष, दुश्मनी या सर्वांचे दर्शन या काही मिनिटांच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते आहे. त्याचसोबत आलिया आणि रणवीर सिंगचा रोमॅण्टिक अंदाज पाहायला मिळतो आहे. डान्स, ड्रामा, बिनधास्त डायलॉग्ज, गाणी, रोमान्स आणि रिलेशनशिप, प्रेम याचा संगमही या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. आलिया आणि रणवीर सिंग म्हणजेच रॉकी आणि रानी हे दोघंही 3 महिने एकमेकांच्या घरी आपल्या परिवाराला समजून घेण्यासाठी राहण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे या चित्रपटाला एक वेगळाच ट्विस्ट मिळाला आहे. आता यामुळे नक्की काय काय या चित्रपटातून पाहायला मिळेल याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

पाहा ट्रेलर 

आलिया भट्ट, रणवीर सिंग, जेष्ठ अभिनेत्री जया बच्चन, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, शबाना आझामी अशी मल्टिस्टारर ही फिल्म प्रेक्षकांचे मनोरंजन करेल याची खात्री आहे. येत्या 28 जूलैला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. करण जोहरनं या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *