Headlines

एखादं नातं किती गोड असावं? सुहाना खान पार्टीतून निघताच बिग बींचा नातू तिच्यामागोमाग आला आणि…

[ad_1]

Manish Malhotra Diwali Party : सेलिब्रिटींच्या घरातील सणवार नेमके कसे साजरा केले जातात याविषयी चाहत्यांना कायमच कुतूहल पाहायला मिळतं. याच सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली ती म्हणजे सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रानं आयोजित केलेल्या Diwali Party मध्ये. 

सलमान खान, किआरा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, ऐश्वर्या राय बच्चन यांच्याबासून नवोदित कलाकारांनीही मनिषच्या या दिवाळी पार्टीला हजेरी लावली. सेलिब्रिटींची दिवाळी पार्टी म्हटलं की, तिथं जबरदस्त फॅशनेबल लूक्सचीही चर्चा आली. या पार्टीत असं दृश्यही पाहायला मिळालं. या लूक्समध्ये सर्वाधिक लक्ष वेधलं ते म्हणजे ‘आर्चिस’च्या स्टारकास्टनं. 

सुहाना खान, खुशी कपूर अगस्त्य नंदा आणि सहकलाकारांनी पार्टीसाठी हजेरी लावताच त्यांच्या लूकवर आणि त्याहूनही त्यांच्या केमिस्ट्रीवर सर्वांच्याच नजरा खिळल्या. कलाकारांची गर्दी असणाऱ्या या पार्टीतून ज्यावेळी ही मंडळी पुन्हा आपआपल्या वाटांवर निघू लागले तेव्हा माध्यमांत्या प्रतिनिधींनी काही असे क्षण टीपले ज्याची बरीच चर्चा झाली. 

अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा यांचं नातं आता नवं राहिलेलं नाही. आपल्या नात्याची आणि एकमेकांवरील प्रेमाची कबुली देणारी ही जोडी एकमेकांचा हात धरूनच परतीच्या वाटेवर निघाली. त्यांच्यावरून नजर हटत नाही तोच तिथं शाहरुखच्या लेकीनंही परतण्याचा निर्णय घेतला आणि ती पापाराझींसमोरूनच कारपाशी आली. 

तो आला… त्यानं जिंकलं

सुहानामागोमाग अमिताभ बच्चन यांचा नातू, म्हणजेच श्वेता बच्चन नंदाचा मुलगा अगस्त्य नंदा तिथं आला आणि त्यानं कारपाशी येत तिला निरोप दिला. तिच्यासोबतच सहकलाकार युवराज मेंदा यालाही त्यानं निरोप दिला. लाल रंगाचा लेहंगा आणि सोनेरी रंगाच्या चमकदार चोळीमध्ये सुहानाचं सौंदर्य खुलून आलं होतं. तर, काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये यावेळी अगस्त्यही रुबाबदार दिसत होता. 

 

सर्व सेलिब्रिटी परतले, त्यांचे फोटोही टीपले गेले. पण, सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे अगस्त्य आणि सुहानाच्या नात्याची. फार आधीपासूच या दोन्ही सेलिब्रिटी किड्सची ‘खास’ मैत्री चर्चेचा विषय ठरली. इतकंच काय तर, सार्वजनिक ठिकाणी त्या दोघांचं एकमेकांसोबत वावरणंही सर्वांचीच मनं जिंकून गेलं. आता अगस्त्य आणि सुहानाचं हे नातं भविष्यात नेमकं कोणत्या वळणावर जाईल हे पाहणं औत्स्युक्याचं ठरणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *