Headlines

ekanath shinde speech in diwali pahat program in thane spb 94

[ad_1]

यंदा शिंदे गटाकडून ठाण्यात ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेली बोलताना त्यांनी चांगलीच शाब्दीक फटकेबाजी केली. “भारत-पाकिस्तान सारखाच आम्हीही तीन-साडेतीन महिन्यांपूर्वी एक सामना खेळलो आणि जिंकलो”, असे ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी दिवाळीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छाही दिल्या.

हेही वाचा – भारतीय जवान हेच माझं कुटुंब, यापेक्षा गोड दिवाळी असू शकत नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री

“दिवाळीबरोबच काल भारताने पाकिस्तानविरुद्ध जो सामना जिंकला, त्याचा आनंदही आपण आज साजरा करतो आहे. तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल तर, काल मेलबर्नच्या मैदानातही आपली ‘बाळासाहेबांची शिवसेना’ झळकली होती. कालचा सामना जसा जिंकला, तसाच सामना आम्ही तीन-साडेतीन महिन्यांपूर्वी खेळलो आणि जिंकलोही. तो सामना महाराष्ट्राने, देशाने बघितला. लोकांच्या मनातलं राज्य आणण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आम्ही सत्तेत येताच, आधी आपली परंपरा, संस्कृती, सण, उत्सव साजरे करण्याची परवानगी दिली”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

हेही वाचा – “…तर खुर्चीखाली धमाका”, दिवाळीच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचा शिंदे सरकारला इशारा; म्हणाले “रोज आपटी बार का होतोय?”

“खरं सांगायचं तर विकासाबरोबर या गोष्टीही आवश्यक आहेत. माणसाचे मन प्रसन्न असेल, तर त्याला पुढे जाता येतं. या राज्यात आता एक परिवर्तनाचे पर्व सुरू झाले आहे. आज मी ज्या ठिकाणी जातो, तिथे उत्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळतो. या गोष्टींचे समाधान आणि आनंदही वाटतो. त्याचे परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीतही दिसून आले”, असेही ते म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *