Headlines

“एकाच वेळी दोन्ही भाषणं सुरु झाली तर…”; दसरा मेळाव्याला कोणाचं भाषण ऐकणार? विचारल्यावर अजित पवारांनी हसत दिलं भन्नाट उत्तर | Ajit Pawar on Who Dasara Melava speech he will listen Cm eknath shinde or shivsena chief uddhav thackeray scsg 91

[ad_1]

राज्यामधील सत्तांतरणानंतर पहिल्यांदाच होत असणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासंदर्भात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमधून बंड करुन बाहेर पडलेल्या शिंदे गटाने जूनच्या शेवटच्या दिवशी राज्यामध्ये शिंदे यांना मुख्यमंत्री करत सरकार स्थापन केलं. तेव्हापासून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटामध्ये खऱ्या शिवसेनेवरुन वाद सुरु आहे. ही न्यायालयीन लढाई सुरु असतानाच दोन्ही गटांकडून ‘शिवसेनेचा दसरा मेळावा’ म्हणून टीझर जारी करत मेळाव्याच्या वेळेसंदर्भात घोषणा करण्यात आली आहे.

गुरुवारीच मुख्यमंत्री शिंदेंनी वांद्रा कुर्ला संकुल येथील मैदानावर सायंकाळी पाच वाजता शिंदे गटाचा दसरा मेळावा होईल असं जाहीर केलं आहे. तर आज उद्धव ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा टीझर लॉन्च झाला असून या मेळाव्याचा वेळही पाच वाजता आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांची भाषणं एकाच वेळी सुरु होणार की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याचसंदर्भातून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना आज पुण्यामध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी या प्रश्नावर फारच मजेदार उत्तर दिलं. हे उत्तर ऐकून पत्रकारांनाही हसू अनावर झाल्याचं पहायला मिळालं.

एकाच वेळी मुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं भाषण सुरु झालं तर दसरा मेळाव्याचं कोणाचं भाषण तुम्ही ऐकणार असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. प्रसारमाध्यमांसोबत बोलताना आपल्या हटके वक्तव्यांसाठी लोकप्रिय असणाऱ्या अजित पवारांनी पुन्हा आपल्या या खास शैलीची झलक या प्रश्नाला उत्तर देताना दाखवली. अजित पवार स्वत: उत्तर देताना हसत होते. अजित पवारांनी या प्रश्नाला उत्तर देताना प्रसार माध्यमांना शाब्दिक चिमटेही काढले.

“दसरा मेळाव्याला कोणाचंही भाषण ऐकलं आणि एकाच वेळी दोन्ही भाषणं सुरु झाली तर उद्धव ठाकरेंचं भाषण पहिल्यांदा ऐकू. मग एकनाथरावांचं,” असं अजित पवार म्हणाले. पुढे माजी उपमुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे पाहून, “तुम्ही रिपीट करतच असता. तुमचं कामच आहे. त्यामुळे दुसरं चॅनेल लावायचं आणि दुसरं भाषण ऐकायचं. यात काय? अर्धा तास पुढं मागे झालं तरी बिघडलं कुठं?” असं हसतच उत्तर दिलं.

अजित पवार यांनी वांद्रे कुर्ला संकुलामध्ये काही दिवसांपूर्वी झालेलं उद्धव ठाकरेंचं गट प्रमुखांच्या मेळाव्यातील भाषणाच्या दिवशी प्रसारमाध्यमांनी कशाप्रकारे सगळं योग्य रितीने प्रसारित केलं याबद्दलचा दाखलाही दिला. याच दिवशी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात भाषण दिलं होतं. याचाचसंदर्भ देत अजित पवारांनी, “दिल्लीचं कसं दाखवत होता. एकीकडे उद्धव ठाकरेंचं भाषण सुरु होतं. ते भाषण झाल्यानंतर तुम्ही एकनाथरावांचं भाषण दाखवलं. त्यात तुम्ही तरबेज आहात. आम्ही बघणारे काही काळजी करण्याचं कारण नाही,” असं अजित पवार हसत म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *