Headlines

Diwali 2022 : लक्ष्मीपूजनासाठी झाडू खरेदी करताना अजिबात करु नका ‘या’ चुका; पाहा खरेदीसाठीची योग्य वेळ

[ad_1]

Diwali Laxmipujan 2022 : दिवाळीच्या (Diwali 222) दिवसांमध्ये येणारा प्रत्येक क्षण अविस्मरणीय असतो. आनंदाच्या या पर्वात जणू काही सर्व देवदेवता आपल्याला शुभाशिर्वाद देत असतात. अशा या दिवाळीच्या यंदाच्या पर्वाची सुरुवात अवघ्या काही क्षणांनी होत आहे. त्याआधी उरलंसुरलं सर्व सामान खरेदी करण्यासाठी बरेचजण बाजारपेठांची वाट धरत आहेत. फुलं, पूजा सामग्री या साऱ्यासोबत झाडू खरेदी करण्यासाठीही अनेकांचीच घाई सुरु आहे. (Diwali 2022 precautions while purchasing broom for laxmipujan)

आपलं घर प्रसन्न, स्वच्छ असावं अशीच अनेकांची कामना असते. त्यातच झाडू किंवा केरसुणीला आपण लक्ष्मी मानत तिची पूजा करत असतो. असं म्हणतात ‘स्वच्छता जिथे जिथे, साक्षात लक्ष्मी तिथे तिथे’. याच कारणामुळे लक्ष्मीपूजेच्या दिवळी झाडूचीही पूजा करतात. 

झाडू कधी घ्यावा, कुठे ठेवावा, कोणत्या दिशेला ठेवावा? (right place to put broom in home)

– लक्ष्मीपूजनाचा (Laxmipujan) झाडू धनत्रयोदशीच्या दिवशी आणावा. लक्ष्मीला घरात आणण्याचा हा योग्य दिवस.
-झाडू खरेदी करताना त्याच्या काड्या खराब नाहीत नाह याकडे लक्ष द्या. सहसा प्लास्टिकचा झाडू खरेदी करणं टाळा.
– लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडू (Broom) देवीच्या स्वरुपात असते. पण, तिला घरात आणण्यापूर्वी अलक्ष्मीला घरातून बाहेर काढावं. लक्ष्मीपूजेची पूजा मांडून झाल्यानंतर घराच्या एका टोकापासून दरवाजापर्यंत झाडू न उचलता झाडत यावा. उंबऱ्यापाशी आल्यानंतर झाडूडा लहानसा भाग तोडून फेकावा आणि म्हणावं, ‘अलक्ष्मी नि:सारणम’. थोडक्यात अलक्ष्मीचा नाश होवो.
– जुनी केरसुणी बाहेर ठेवावी आणि नव्या केसरुणीची बाहेरच पूजा करुन तिला घरात आणावी आणि तिला पुन्हा पुजावं.
– जुनी केरसुणी सहसा शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी बाहेर काढावी आणि अशा ठिकाणी ठेवावा जिथे कुणाचा पाय लागणार नाही. 
– झाडू नेहमी पश्चिम- दक्षिण दिशेच्या कोपऱ्याला म्हणजेच नैऋत्येला ठेवावा. झाडूही लक्ष्मीचं प्रतीक असल्यामुळं तो इतरांना दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावा. 

– झाडू नेहमी उभा ठेवावा. झाडण्याची बाजू कायम खाली असावा. 
– झाडू स्वयंपाकघर (खगूमपाल), देवघर, बेडरुममध्ये ठेवू नये. 
– झाडूने उष्टं अन्न कधीच उचलू नका. ज्या घरामध्ये झाडूचा उपयोग योग्य पद्धतीने होतो तिथे लक्ष्मीचा वावर असतो. झाडूचा कायम आदर करावा. त्याला पाय लागणार नाही याची काळजी घ्या, झाडू ओलांडू नका. 
– एखादी व्यक्ती घराबाहेर गेल्यास लगेचच घर झाडू नका. अर्ध्या तासानंतर झाडू मारा. 
– स्वप्नात तुम्हाला कोणी झाडू दिला तर, तो शुभसंकेत असेल. पण, तुम्ही कुणाला झाडू भेट स्वरुपात देऊ नका. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *